एसटी संपाबाबत तोडगा निघणार? अनिल परबांची शरद पवारांसोबत गुप्त बैठक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Anil parab-Shard Pawar

शरद पवारांची मध्यस्थी, ST संप मिटणार?

मुंबई : एसटी कर्मचारी गेल्या अनेक दिवसांपासून संपावर (ST Employee Strike) गेले आहेत. त्यासंदर्भात आता राष्ट्रवादीचे नेते शरद पवार (Sharad Pawar) आणि परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांची वरळीतील नेहरू सेंटर येथे बैठक सुरू आहे. मात्र, या बैठकीबाबत कमालीची गुप्तता पाळली जात आहे. अद्यापही एसटी संपावर तोडगा निघाला नसल्याने ही बैठक सुरू आहे. त्यामुळे आता शरद पवारांनी पुढाकार घेतला असून आता एसटी संपाबाबत मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. शरद पवारांच्या मध्यस्थीनंतर संप मागे घेतला जाण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: अमरावती दंगलीवेळी राज्यातील इंटलिजन्स अपयशी का ठरलं? संजय राऊत म्हणाले...

गेल्या दहा दिवसांपेक्षा अधिक कालावधी लोटला आहे, तरीही एसटी कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलनीकरण करावे, अशी एसटी कर्मचाऱ्यांची प्रमुख मागणी आहे. त्यासाठी एक समिती देखील तयार करण्यात आली आहे. सध्या एसटी कर्मचाऱ्यांचे विलनीकरण शक्य नाही, असं राज्य सरकारकडून सांगितले जात आहे. तसेच अनेक एसटी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. अनेकांना सेवा समाप्ती करू, असा इशारा देखील सरकारने दिला आहे.

मात्र, एसटी कर्मचारी आपल्या संपाबाबत ठाम आहेत. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत असून खासगी वाहकांकडून प्रवाशांची लूट केली जात आहे. आता शरद पवारांनी यामध्ये उडी घेतली असून त्यांची परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासोबत वरळीतील नेहरू सेंटर येथे बैठक सुरू आहे. यामध्ये एसटी संपाबाबत चर्चा केला जात असून मोठा निर्णय होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. आता एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा निघतो का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

loading image
go to top