शेतकऱयांना कर्जमाफीपर्यंत संघर्षः शरद पवार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 एप्रिल 2017

पनवेल- शेतकऱयांना कर्जमाफी मिळेपर्यंत संघर्ष करणार. सरकारने आमचे ऐकले नाही तर राज्यकर्त्यांचे जगणे हराम करु, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज (मंगळवार) सरकारवर टीका केली.

पनवेल- शेतकऱयांना कर्जमाफी मिळेपर्यंत संघर्ष करणार. सरकारने आमचे ऐकले नाही तर राज्यकर्त्यांचे जगणे हराम करु, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज (मंगळवार) सरकारवर टीका केली.

शरद पवार यांच्या उपस्थितीत पनवेलमध्ये विरोधकांच्या संघर्ष यात्रेचा समारोप झाला. यावेळी बोलताना पवार म्हणाले, भारतीय जनता पक्षाने (भाजप) कर्जमाफीचा शब्द दिला होता, मात्र हे सरकार शब्द पाळत नाही. उत्तर प्रदेशात शेतक-यांना कर्जमाफी मग महाराष्ट्रात का नाही? दिलेला शब्द पाळायचा नाही ही भाजपाची संस्कृती आहे. फडणवीस सरकारला शेतकरी इंगा दाखवल्याशिवाय राहणार नाही. शेतकऱ्यांनो, जीव द्यायचा नाही, आम्ही तुमच्यासाठी आंदोलन करत आहोत. शेतकऱयांना कर्जमाफी मिळेपर्यंत संघर्ष करणार आहोत.

काँग्रेसचे नेते नारायण राणे म्हणाले, 'फडणवीस सरकार हे शिवाजी महाराजांचे आशीर्वाद घेऊन सत्तेवर आले, परंतु, एकही घोषणा पूर्ण केलेली नाही. शाश्वत विकास केव्हा, कसा करणार हे कुणीही सांगत नाही. एकाही शेतमालाला भाव मिळत नाही. कर्जमाफीच्या घोषणा दिल्या तर आम्हाला निलंबित केले.'

'येत्या तीन दिवसात शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या, अन्यथा विशेष अधिवेशन बोलवा, आम्ही यायला तयार आहोत,' असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sharad pawar attack on government about farmers waiver