Jayant Patil : बीडमध्ये लागलेल्या शरद पवारांच्या पोस्टर्सवरुन जयंत पाटलांचा थेट हल्ला; म्हणाले...

Jayant Patil : बीडमध्ये लागलेल्या शरद पवारांच्या पोस्टर्सवरुन जयंत पाटलांचा थेट हल्ला; म्हणाले...
Updated on

बीडः बीडमध्ये आज शरद पवार यांच्या स्वाभिमान सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. बीड विधानसभा मतदारसंघाचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या वतीने या सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे.

बीडच्या सभेसाठी शरद पवार यांच्यासह जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, रोहित पवार, अनिल देशमुख यांच्यासह पक्षाच्या प्रमुख नेत्यांची हजेरी आहे.

यावेळी बोलताना जयंत पाटील म्हणाले की, संदीप क्षीरसागर यांनी कधीही राष्ट्रवादीच्या कार्यालयात फोन केला नाही. स्वतःच्या हिंमतीवर एवढा भव्य कार्यक्रम आयोजित केला आहे. आजची ही स्वाभिमानी लोकांची सभा आहे.

Jayant Patil : बीडमध्ये लागलेल्या शरद पवारांच्या पोस्टर्सवरुन जयंत पाटलांचा थेट हल्ला; म्हणाले...
Crime News : धक्कादायक! महिलेला जिवंत पुरलं; 11 दिवसांनंतर कबर खोदून बाहेर काढलं

पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले की, आपल्यात स्वाभिमान पेरण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं आहे. त्यांचं स्वराज्य स्वराज्यरक्षक संभाजी महाराजांनी टिकवून वाढवलं. महाराष्ट्राची मोठी राजकीय परंपरा आहे. परंतु आज परिस्थिती बिघडली आहे. आजपर्यंत महाराष्ट्राने सूडाचं राजकारण कधीही पाहिलं नाही परंतु आज सत्तेसाठी काहीपण केलं जात असून ही भूमिका महाराष्ट्रात दोनदा दिसली. नवाब मलिकांच्या बाबतीत हेच झालं. त्यांना अडचणीत आणण्याचं काम आम्ही करणार नाही.

Jayant Patil : बीडमध्ये लागलेल्या शरद पवारांच्या पोस्टर्सवरुन जयंत पाटलांचा थेट हल्ला; म्हणाले...
पक्ष फुटलेला नाही, हे शरद पवारांनी आधीच सांगितलं, आमचं ताणलं म्हणून तुटलं; शिरसाठांचं विधान

बीड शहरात लागलेल्या फ्लेक्सची मागच्या दोन दिवसांपासून राज्यभर चर्चा झाली होती. त्यावरुन बोलतांना जयंत पाटील म्हणाले की, शहरात पवार साहेबांचे पोस्टर्स लावलेले आहेत. पवार साहेब येणार आहेत, हे जास्त करुन त्यांनीच सांगितलं. आमचं निम्म काम त्यांनीच केलं. आशीर्वादाची गरज त्यांना आहे, हे ऐकून समाधान वाटलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

What is the Shaktipeeth Highway project?
Maharashtra politics latest Jayant Patil statement
Jayant Patil and Devendra Fadnavis kolhapur plane tour
Jayant Patil  devendraFadnavis meeting
Marathi News Esakal
www.esakal.com