Sharad Pawar: आजारपणानंतर शरद पवार अ‍ॅक्शनमोडमध्ये; आखणार रणनिती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sharad pawar

Sharad Pawar: आजारपणानंतर शरद पवार अ‍ॅक्शनमोडमध्ये; आखणार रणनिती

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना काहीदिवसांपूर्वी रुग्णलायतून डिस्चार्ज मिळाला आहे. काही दिवस ते विश्रांतीवर होते. प्रकृती बिघडल्यामुळे शरद पवार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेतही सहभागी झाले नव्हते. दरम्यान, शरद पवार आजारपणानंतर अ‍ॅक्शनमोडमध्ये आले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ माजली आहे. (Sharad Pawar Called NCP Leaders Meeting Maharashtra Local Body Elections maharashtra politics)

आजारपणानंतर शरद पवार यांनी स्वतः राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक बोलावली आहे. आज राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात सकाळी ही बैठक होणार आहे. आगामी स्थानिक स्वराज्यांच्या निवडणुकांच्या अनुषंगानं बैठकीत चर्चेची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे पवारांनी बोलावलेली ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे.

एकीकडे राज्य सरकारने नव्याने प्रभाग रचना करण्याचे आदेश दिले असतानाच दुसरीकडे ओबीसी आरक्षण आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या प्रलंबित निवडणुका त्वरित घेण्याची विनंती करणारी याचिका सुप्रीम कोर्टासमोर आहे. यावर 28 नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे. दरम्यान, पवारांनी बोलावलेली बैठक महत्त्वाची मानली जात आहे.

राज्य निवडणूक आयोगानं 92 नगरपरिषदांच्या निवडणुका जाहीर केल्या होत्या. या नगरपरिषदांच्या निवडणुका जाहीर झाल्या, तेव्हा सुप्रीम कोर्टात ओबीसी आरक्षणाबाबत सुनावणी सुरू होती. या 92 नगरपरिषदांमधील निवडणुका ओबीसी आरक्षणासह करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न सुरू होता.

सर्वोच्च न्यायालयानं ओबीसी आरक्षणाबाबत निकाल दिला, त्यावेळी या संदर्भातली निवडणूक प्रक्रिया सुरू झाली होती. त्यामुळे आता तिथे ओबीसी आरक्षण लागू करण्यास सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला आहे. राज्य निवडणूक आयोगानं 14 जुलै रोजी या 92 नगरपरिषदांच्या निवडणुका स्थगित केल्याची घोषणा केली होती.

टॅग्स :Sharad PawarNCPelection