मुंबई - ‘सत्तेच्या गैरवापरासाठी ‘ईडी’ला वापरले जात असून मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्याच्या (पीएमएलए) माध्यमातून विरोधकांना लक्ष्य केले जात आहे. कायद्याचा गैरवापर थांबायला हवा. न्यायव्यवस्था लोकांसमोर आदर्श अशी असावी..या व्यवस्थेला ‘ईडी’ सारख्यांच्या हाती दिलेल्या शक्तीमुळे निर्णय घेण्याची इच्छा असतानाही मर्यादा येत आहेत; तसे होत असेल तर ती बदलण्याची गरज आहे. यापुढे परिवर्तन केले तर पहिले काम हे कायद्यातील सुधारणेचे करावे लागेल.सामान्य माणसाचा व पक्षाचा अधिकार जो ‘ईडी’ कायद्याचा आधार घेऊन उद्ध्वस्त केला जात आहे, त्यासंबंधीची तरतूद रद्द करावी लागेल,’’ असे मत राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले..शिवसेना- ठाकरे गटाचे खा. संजय राऊत यांनी लिहिलेल्या ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लेखक, कवी जावेद अख्तर हे होते तर प्रमुख पाहुणे शिवसेना - ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, तृणमूल काँग्रेसचे राज्यसभा खासदार साकेत गोखले आणि ‘न्यू ईरा’ प्रकाशनाचे शरद तांदळे उपस्थित होते.यावेळी शरद पवार यांनी ‘पीएमएलए’ कायद्याचा वापर करून विरोधकांना उद्ध्वस्त केले जात असल्याची तोफ डागली. संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या (यूपीए) काळात ‘पीएमएलए’ कायद्यात करण्यात आलेले बदल किती घातक आहेत याची भीती आपण त्यावेळी व्यक्त होती असे पवार म्हणाले. याविषयीचे अनुभव त्यांनी सांगितले....अन् राऊत अडकले‘पत्राचाळीमध्ये कष्ट करणारे मध्यमवर्गीय लोक राहत होते. त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला, त्या चाळकऱ्यांना घरे मिळावी अशी त्यांची मागणी होती. ते संजय राऊत यांच्याकडे पोहोचले. संजय राऊत यांच्या नेहमीच्या लिखाणाने दुखावलेल्या शासकीय यंत्रणेला संधी मिळाली.या प्रकरणात ‘ईडी’चे योगदान अधिक आहे. ‘ईडी’ने केलेल्या केसमध्ये संजय राऊत यांचा संबंध नसताना त्यांना गुंतवले गेले. काही लोक चुकीचे काम करत होते, हे माहीत असताना त्यांच्या संबंधी कारवाई होत नव्हती. संजय राऊतांनी खासदार म्हणून देशाच्या प्रमुखांना पत्र लिहिले..जे लोक शासकीय यंत्रणेशी भ्रष्टाचाराच्या मार्गाने संबंध ठेवतात, अशा लोकांमार्फत पैसे कसे गोळा केले जातात याचे सविस्तर लिखाण केंद्र सरकारला कळविले,’ असे शरद पवार म्हणाले.त्या प्रकरणात ३० ते ३५ लोक, कंपन्या अशा होत्या, त्यांच्याकडून पैसे काढले गेले. ती रक्कम ५८ कोटींच्या आसपास होती. ही माहिती संजय राऊतांकडे आल्यानंतर त्यांनी देशाच्या प्रमुख लोकांना ती लिखित स्वरूपात दिली, त्याचा परिणाम एकच झाला, कारवाई झाली नाही आणि राऊत यांना आत जावे लागले, असे ज्येष्ठ नेते शरद पवार म्हणाले..उपकार मोजायचे नसतात - ठाकरेउद्धव ठाकरे हे गृहमंत्री अमित शहा यांचे नाव घेऊन म्हणाले, ‘तुम्ही आम्हाला कशासाठी एवढा दुश्मन समजताय, आम्ही विरोधी विरोधी म्हणजे कोणाचे विरोधी. आमची आणि तुमची मते वेगळी आहेत. आमचे हिंदुत्व हे देशासाठी आहे. हे म्हटल्यानंतर तुम्ही आम्हाला दुश्मनाच्या पिंजऱ्यात उभे करताय. पाकिस्तानपेक्षा आधी आम्हाला खतम करा..शिवसेना ही मराठी माणसांचे हित जपते म्हणून शिवसेनेवर वरवंटा फिरवला जात आहे. मला जर कोणी विचारले की अमित शहा तुमच्या घरी आले होते का, त्यांनी बाळासाहेबांकडे मदत मागितली होती का, तर मी म्हणेन मला आठवत नाही. उपकार मोजायचे नसतात. ते करायचे असतात.’.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.