'शांततेच्या मार्गाने वाटचाल करताना अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न' | Sharad Pawar | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sharad Pawar
'शांततेच्या मार्गाने वाटचाल करताना अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न'

'शांततेच्या मार्गाने वाटचाल करताना अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न'

मुंबई : राज्य शांततेच्या मार्गाने वाटचाल करत असताना या ना त्या निमित्ताने अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. काल अमरावती (Amravati Riot) ग्रामीण भागात बंद पुकारण्यात आला होता. तो शांततेच्या मार्गाने पार पडला. मात्र आता एका राजकीय पक्षाने पुन्हा जिल्हा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांनी भाजपचा (BJP) उल्लेख न करता केली आहे. पुढे ते म्हणतात, की याचा अर्थ काही राजकीय पक्षाचे घटक दुर्दैवाने त्यांच्यामध्ये असलेल्या नैराश्याची प्रतिक्रिया सार्वजनिक शांततेला धक्का बसेल या पद्धतीने व्यक्त करताना दिसत आहेत. ही अत्यंत दुर्दैवी आणि दुःखद गोष्ट आहे. ज्यांनी राज्य चालवले त्यांनी कमीत-कमी राज्याला, सर्वसामान्यांच्या हिताला धक्का न लागेल अशा प्रकारची भूमिका घ्यायला हवी.

हेही वाचा: JNU मध्ये विद्यार्थी संघटना पुन्हा भिडल्या, अनेक जण जखमी

पण त्याचे भान राहिलेय की नाही याची शंका यावी, अशी स्थिती इथे निर्माण झाली. ही दुःखद गोष्ट असल्याचे पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हणाले. नुकतेच शिवसेना नेते संजय राऊतांनी अमरावतीतील दंगलीवरुन भाजप पेटवा-पेटवीचे राजकारण करत असल्याचा आरोप केला होता.

loading image
go to top