
शरद पवार दिल्लीत जाणार; राष्ट्रवादीच्या संमेलनात राजकीय खलबतांचे संकेत
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सध्या चांगलेच चर्चेत आहेत. त्यांच्यावर होणाऱ्या टीका, केतकी चितळे प्रकरण, अजूनही ताजं असलेलं भिडे वाडा आणि दगडूशेठ हलवाई गणपती भेट प्रकरण या सगळ्यानंतर आता शरद पवार दिल्लीत जाणार आहेत. निमित्त आहे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचं संमेलन. (NCP chief Sharad pawar to visit Delhi NCP youth congress meeting)
शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी ट्विट करत या दौऱ्याविषयी माहिती दिली आहे. ट्विटमध्ये शरद पवार म्हणतात, "देशात धर्म आणि सांप्रदायाच्या नावावर ध्रुवीकरणाचा प्रयत्न एका विशिष्ट विचारधारेचे लोक करत आहेत. यामुळे समाजात तणाव निर्माण होतो. त्यामुळे अशा घातक शक्तींच्या विरोधात उभं राहण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसने निर्धार केलेला आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मला भेटून अशा नाजूक वेळी युवकांना मार्गदर्शन करण्याचं आवाहन केलं. याबद्दल तरुण वर्गात जनजागृती करण्यासाठी देशाच्या राजधानीत राष्ट्रवादी युवक काँग्रेस एक मोठं संमेलन घेणार आहे. या कार्यक्रमात सामील होण्यासाठीचं निमंत्रण तरुण कार्यकर्त्यांनी दिलं आहे. धार्मिक - जातीय ध्रुवीकरण लोकशाहीसाठी धोकादायक आहे. यासाठी याच्या विरोधात उभे राहणाऱ्या आमच्या तरुणांचं मनोबल वाढवण्यासाठी मी हे निमंत्रण स्वीकारत आहे".
हेही वाचा: ब्राह्मण संघटनांच्या भेटीनंतर शरद पवार दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाला
राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या या संमेलनाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार दिल्लीत जाणार आहेत. या आधीही ममता बॅनर्जींसह शरद पवार आणि इतर विरोधकांनी एकत्र येत ध्रुवीकरण करणाऱ्या शक्ती आणि भाजपाविरोधात लढण्यासाठी एकत्र येण्याची घोषणा केली होती. त्यानंतर अनेक खलबतं झाली. या संमेलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीला जात आता शरद पवार कोणती नवी रणनीती आखणार याकडे लक्ष लागलेलं आहे.
Web Title: Sharad Pawar Delhi Nationalist Congress Party Meeting About Polarization On Caste And Religion
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..