sharad pawar different stand
sharad pawar different stand

Sharad Pawar: मविआची वज्रमूठ सैल? 8 दिवसात 'या' मुद्यांवरुन शरद पवारांनी काँग्रसला फटकारले

विरोधकांच्या टीकेत शरद पवार यांचा वेगळा सूर

Sharad Pawar: गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भूमिका पाहता मविआची वर्जमुठ सैल पडणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. 8 दिवसात ३ मुद्यांवरुन शरद पवारांनी काँग्रसला फटकारले आहे. त्यामुळे काँग्रेस काय भूमिका काय मांडणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. (sharad pawar different stand )

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी अवघे काही महिने उरले आहेत. अशा स्थितीत काँग्रेस, आम आदमी पार्टीसह विविध विरोधी पक्षांनी रणनीती म्हणून केंद्रातील मोदी सरकारला घेरण्यास सुरुवात केली आहे. मात्र, शरद पवार यांनी विरोधकांच्या प्रश्नांवरच ठाम भूमिका घेतली आहे.

सावरकर, अदानी, पंतप्रधान यांच्या बनावट पदवी प्रकरणावर त्यांनी 8 दिवसात सत्ताधाऱ्यांच्या बाजून मत मांडले. हे तेच मुद्दे आहेत ज्यावरून विरोधक केंद्रावर सातत्याने निशाणा साधत होते. शरद पवारांची ही विधाने भाजपसाठी मोठा दिलासा देणारी असली तरी विरोधकांच्या कठोर वृत्तीला खिंडार पाडणारी आहेत.

sharad pawar different stand
Eknath Shinde: मुख्यमंत्र्यांना दोन दिवसांनंतर आली जाग! शिंदेंनी अवकाळी पावसाबाबत बोलवली बैठक

8 दिवसात ३ मुद्यांवरुन शरद पवारांनी काँग्रससह आपला फटकारले

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याकडून वारंवार अपमान केला जातोय. दरम्यान, शरद पवार यांनी झालेल्या एका बैठकीत राहुल गांधीं यांचे कान टोचले होते. तसेच, स्वातंत्र्यवीर सावरकर हा काही राष्ट्रीय मुद्दा नाही.

याचा अर्थ त्यांना महत्त्व नाही असे नाही. देशासाठी त्यांनी केलेला त्याग व समर्पणाला तोड नाही. आपल्याला प्रगतिशील विचारांचे व वैज्ञानिक दृष्टिकोनाचा स्वीकार करणारे सावरकरही स्वीकारावे लागतील.

“गाय हा एक उपयुक्त पशू आहे’ असे सावरकर म्हणाले होते, तर पतित पावन मंदिरात पूजेसाठी त्यांनी वाल्मिकी समाजाचा पुजारी नेमला होता, हेही सावरकर स्वीकारले पाहिजे,’ असे मत त्यांनी व्यक्त केले होते.

हिंडेनबर्ग अहवालानंतर विरोधकांनी अदानी समूहाबाबत आक्रमक पवित्रा घेतला असताना शरद पवारांनी वेगळी भूमिका मांडली. शरद पवार यांनी ‘एनडीटीव्ही’ला दिलेल्या मुलाखतीत संसद अधिवेशन, अदानी आदी अनेक मुद्यांवर भाष्य केले. पूर्वी सरकारवर टीकेची झोड उठविण्यासाठी टाटा-बिर्ला समूहांची नावे विरोधकांकडून घेतली जात होती. या समूहांचे देशाच्या विकासातील योगदान सर्वाना माहीत आहे.

आताच्या काळात अदानी-अंबानी समूहांची नावे सरकारला लक्ष्य करताना घेतली जातात. अंबानी समूहाने पेट्रोकेमिकल्स आणि अन्य क्षेत्रांत भरीव काम केले आहे. अदानी समूहाने वीज व अन्य क्षेत्रांत मोठे काम केले आहे.

देशाला त्याची गरज आहे ना? या समूहांनी बेकायदा किंवा काही चुकीचे केले असल्याचे पुरावे असतील तर टीका करण्याचा हक्क लोकशाहीत आहेच, पण पुरावे नसल्यास ते चुकीचे आहे’’, असे पवार म्हणाले.

sharad pawar different stand
Sharad Pawar : शेतकऱ्यांच्या संधी उध्वस्त करणे हेच सरकारचे धोरण : शरद पवार

दिल्ली आणि पंजाबमधील सत्ताधारी आम आदमी पक्ष सध्या पंतप्रधान मोदींच्या पदवीच्या मुद्द्यावरून भाजपवर हल्लाबोल करत आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह अनेक नेते पंतप्रधानांच्या पदवीवर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.

'आप'ने लोकसभा निवडणुकीपूर्वी हा मुद्दा जोरात मांडण्याचे ठरवले असताना, पवारांनी पंतप्रधानांची पदवी हा राजकीय मुद्दा नसल्याचे स्पष्ट केले.

देशात , तुमची पदवी कोणती, माझी पदवी कोणती, हा राजकीय मुद्दा आहे का? बेरोजगारी, कायदा आणि सुव्यवस्था, महागाई असे अनेक प्रश्न असून या प्रश्नांवर केंद्र सरकारवर हल्लाबोल झालाच पाहिजे.

आज धर्म आणि जातीच्या नावावर लोकांमध्ये मतभेद निर्माण केले जात आहेत, आज महाराष्ट्रात अवकाळी पावसाने पिके उद्ध्वस्त झाली, यावर चर्चा आवश्यक असल्याचे म्हटले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com