"...तर या बंडाला अर्थ काय?"; शरद पवारांनी दिल्लीत खोलले 'पत्ते'

आमदारांना परत आणण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं
Sharad Pawar
Sharad Pawar google

दिल्ली : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज दिल्लीत पत्रकार परिषद घेतली आहे. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी विरोधी पक्षांकडून यशवंत सिन्हा यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी ते गेले आहेत. उद्या सिन्हा यांचा उमेदवारी अर्ज भरला जाणार आहे. दरम्यान राज्यातील सध्याच्या राजकीय पार्श्वभूमीवर बोलताना बंडखोर आमदार परत आल्यावर त्यांनी आपली भूमिका बदललेली असेल असं ते म्हणाले.

(Sharad Pawar On Maharashtra Politics)

"संजय राऊत यांनी ४० मृतदेह परत येतील हे विधान मी ऐकलं नाही पण गेलेले आमदार नक्कीच परत येतील असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केला आहे. आजही आमची आघाडी असून आघाडी टिकवण्यासाठी आमचा प्रयत्न असेल, उद्धव ठाकरे यांना आमचा पाठिंबा असेल." असं पवार म्हणाले आहेत.

Sharad Pawar
"...अन्यथा निलंबनास तयार राहा"; वकिलांनी सांगितला फॉर्म्युला

"जर राज्यात राष्ट्रपती राजवट आली तर भाजपने एवढं केलं त्याचा फायदा काय?" असा प्रश्न त्यांनी केला आहे. बंडखोरांनी गुजरात आणि आसाम हे दोन राज्य निवडले आहेत त्या राज्यात भाजपचे सरकार आहे. बंडखोरांकडे संख्याबळ असेल तर ते गुवाहटीत का थांबले आहेत? असे प्रश्न शरद पवारांनी उपस्थित केले आहेत.

बंडखोरांनी आपल्या पाठीमागे राष्ट्रीय पक्ष असल्याचं सांगितलं पण भाजपशिवाय दुसरा पाठिंबा देणारा पक्ष कोणता आहे? असं म्हणत शिंदे यांच्या बंडामागे भाजप असल्याचं पवार यांनी सांगितलं आहे. पण आमची उद्धव ठाकरे यांच्यासोबत कमिंटमेंट आहे, आम्ही त्यांच्यासोबतच आहोत. बंडखोरांवर कारवाई करायची का नाही ते उद्धव ठाकरे ठरवतील. येत्या दोन तीन दिवसांत कारवाई होऊ शकते असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

Sharad Pawar
"बाई थोडी कळ काढा ही शिवसेनेची..."; दिपाली सय्यदचा नवनीत राणांना टोला

"मंत्र्याचे राजीनामे घेण्याचे अधिकार उद्धव ठाकरे यांच्याकडे आहेत ते मी का घेणार? आज नाहीतर उद्या मंत्र्यांचे राजीनामे घेतले जातील. बहुधा यावर आजच शिवसेना पावलं उचलेल. आम्ही आम्हीसुद्धा आमदारांना परत आणण्यासाठी प्रयत्न करणार आहोत." असंही ते म्हणाले.

या लढाईत उद्धव ठाकरे यांचाच विजय होईल अशी आशा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीतील पत्रकार परिषदेत व्यक्त केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com