Manipur Violence: मणिपूरच्या ‘त्या’ घटनेवरून शरद पवार संतापले; आंबेडकरांचे वाक्य ट्विट करून सरकारला खडसावले

मणिपूरमध्ये गेल्या काही महिन्यांपासून हिंसाचार सुरू आहे
Sharad Pawar on Manipur Violence
Sharad Pawar on Manipur ViolenceEsakal

Manipur Violence News Updates: मणिपूरमध्ये कायदा आणि सुव्यवस्था पार उद्ध्वस्त झाल्याचं आता समोर आलं आहे. कारण गेल्या दोन-अडीच महिन्यांपासून जातीय दंगलीनंतर आता आणखी एक माणुसकीला काळीमा फसणारी आणणारी घटना समोर आली आहे.

मणिपूरमध्ये जमावाने दोन महिलांची नग्न धिंड काढत त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा धक्कादायक घटना समोर आली आहे.(Latest Marathi News)

मणिपूरमधील थौबाल जिल्ह्यात ही घटना ४ मे २०२३ रोजी घडली आहे. ही घटना समोर आल्यानंतर पोलिसांकडून अज्ञातांविरोधात अपहरण, सामूहिक बलात्कार आणि हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या धक्कादायक घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर देशभरातून तीव्र प्रतिक्रिया समोर येऊ लागल्या आहेत.(Latest Marathi News)

Sharad Pawar on Manipur Violence
Manipur Violence :"... नाही तर आम्हाला कारवाई करावी लागेल" मणिपूर व्हिडिओवर CJI चंद्रचूड यांनी सरकारला फटकारले

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील या घटनेवरून तीव्र संताप व्यक्त केला आहे. शरद पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये भारतरत्न, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं एक वाक्य लिहिलं आहे. (Without humanity, your glory is worthless) “माणुसकीशिवाय तुझा गौरव व्यर्थ आहे,” हे बाबासाहेबांचं वाक्य शरद पवार यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये लिहिलं आहे.(Latest Marathi News)

Sharad Pawar on Manipur Violence
PM on Manipur Horror: दोषींना सोडले जाणार नाही, पंतप्रधान मोदींचे आश्वासन; मुख्यमंत्र्यांना कठोर कारवाईचे आदेश

'मणिपूरमधील विदारक दृश्यामुळे मन दुखावलं आहे. महिलांवरील अत्याचाराचं हे विदारक दृश्य घृणास्पद असल्याचं पवार म्हणालेत. तर हीच वेळ आहे संघटित होण्याची, एकत्र येण्याची, आपला आवाज उठवण्याची आणि मणिपूरच्या लोकांसाठी न्याय मागण्याची.

मणिपूरमध्‍ये शांतता प्रस्थापित करण्‍यासाठी पंतप्रधान कार्यालयासह गृह विभागाने तातडीने आवश्‍यक कारवाई करणे आवश्‍यक आहे, असंही शरद पवारांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.(Latest Marathi News)

Sharad Pawar on Manipur Violence
Manipur: मणिपूरमध्ये आदिवासी महिलांची काढली विवस्त्र धिंड! माणुसकीला लाज आणणारी घटना आली समोर

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com