Manipur: मणिपूरमध्ये आदिवासी महिलांची काढली विवस्त्र धिंड! माणुसकीला लाज आणणारी घटना आली समोर

मणिपूरमध्ये कायदा आणि सुव्यवस्था पार उद्ध्वस्त झाल्याचं या नव्या घटनेमुळं समोर आलं आहे.
Manipur
Manipur

नवी दिल्ली : मणिपूरमध्ये कायदा आणि सुव्यवस्था पार उद्ध्वस्त झाल्याचं आता समोर आलं आहे. कारण गेल्या दोन-अडीच महिण्यांपासून जातीय दंगलीनंतर आता आणखी एक माणुसकीला लाज आणणारी घटना समोर आली आहे. इथं काही महिलांना विवस्त्र करत त्यांची रस्त्यावरुन धिंड काढण्यात आल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. (Manipur hills video of Adivasi women being paraded naked surfaces)

Manipur
Parliment Monsoon Session: अधिवेशनात 'समान नागरी विधेयका'चा समावेश नाहीच; पाहा संपूर्ण यादी

मणिपूरमधील कांगपोकपी जिल्ह्यात ४ मे रोजी हा प्रकार घडला असून याचे व्हिडिओ गुरुवारी आयटीएलएफच्या आंदोलनादरम्यान व्हायरल करण्यात आले. यामध्ये काही पुरुष हे दुसऱ्या आदिवासी समाजातील दोन असहाय्य महिलांना विवस्त्र करुन त्यांच्या शरिराला स्पर्श करत होते, याद्वारे त्यांचा विनयभंग करत असल्याचा दावा इंडिया टुडेनं आपल्या वृत्तामध्ये केला आहे. या महिलांवर सामुहिक अत्याचार करत त्यांची विवस्त्र धिंड काढण्यात आल्याचं टाइम्स नाऊनं आपल्या वृत्तात म्हटलं आहे. (Latest Marathi News)

Manipur
Mumbai Rain: दहावी-बारावीच्या परीक्षा ढकलल्या पुढे; सुधारित वेळापत्रक जाहीर

पोलिसांकडून चौकशी सुरु

हे भयानक व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेतली असून याची चौकशी सुरु करण्यात आली आहे. तसेच आयटीएलएफच्या प्रवक्त्यांनी गुरुवारी मागणी केली की, या प्रकरणाची राज्य तसेच केंद्र सरकारने तातडीनं दखल घ्यावी तसेच राष्ट्रीय महिला आयोग आणि राष्ट्रीय अनुसुचित जमाती आयोगानं दखल घेत गुन्हेगारांना समोर आणावं. (Marathi Tajya Batmya)

Manipur
Seema Haider: सीमा हैदरकडून 4 मोबाईल, 5 पासपोर्ट जप्त; यूपी पोलिसांची मोठी कारवाई

रोहित पवारांनी व्यक्त केला संताप

या घटनेची माहिती कळताच देशभरातून राजकीय पडसादही उमटायला सुरुवात झाली आहे. या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी संताप व्यक्त केला आहे. त्यांनी ट्विट करत म्हटलं, "एखाद्या महिलेला निर्वस्त्र करून तिची धिंड काढणारे माणसं असूच शकत नाहीत. हे कुकृत्य शब्दांत निषेध करण्यापलीकडचं आहेच पण तेथील सरकार हे महिलांची अब्रू वाचवण्यास असमर्थ म्हणजेच षंढ असल्याचंही लक्षण आहे. समाजाचं होत चाललेलं हे एवढं अध:पतन आपण माणूस म्हणून जगण्यास पात्र आहोत का? हा प्रश्न विचारण्यास भाग पाडतं"

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com