esakal | माझ्यामुळे पवारसाहेबांची बदनामी झाली : अजित पवार
sakal

बोलून बातमी शोधा

sharad pawar gets insulted because of me says ajit pawar

 वाहिन्यांवर सतत शरद पवार आणि अजित पवार यांचेच नाव झळकले जाते. आपल्यामुळे शरद पवार यांची बदनामी होते. त्यामुळे खूप अस्वस्थ झालो, असे अजित पवार यांनी सांगितले... 

माझ्यामुळे पवारसाहेबांची बदनामी झाली : अजित पवार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : वाहिन्यांवर सतत शरद पवार आणि अजित पवार यांचेच नाव झळकले जाते. आपल्यामुळे शरद पवार यांची बदनामी होते. त्यामुळे खूप अस्वस्थ झालो. राजीनामा देण्याचा मी विचार करत होतो. आपल्यामुळे साहेबांना बदनामी सहन करावी लागत आहे. यातूनच मी शरद पवारांना न सांगता राजीनामा दिला. राजीनामा दिल्यानंतर मी फोन बंद केला आणि मुंबईतच होतो. निवडणुकीच्या काळातच बँकेची चौकशी कशी बाहेर आली, असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी सांगितले.

मी सद्सदविवेकबुद्धीला स्मरून राजीनामा दिला. माझ्या सहकाऱ्यांना याचा वेदना झाल्या. यापूर्वीही असा प्रसंग माझ्यावर आला होता. मी सगळ्यांना विश्वासात न घेता हे केल्याने सर्वांची माफी मागतो, असेही पवार यांनी स्पष्ट केले. 

चिंता करण्याचे कारण नाही; कौटुंबिक चर्चा झाली : शरद पवार

तडकाफडकी राजीनामा दिल्यानंतर बेपत्ता असलेले माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आज (शनिवार) तब्बल 19 तासांनंतर शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी पोहचले याठिकाणी त्यांची कौटुंबिक चर्चा झाल्यानंतर अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेणार हे स्पष्ट झाले होते. तर, शरद पवार यांनी हसत-हसत अजित पवार सर्व माहिती देतील असे म्हटले होते. त्यानंतर त्यांनी यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे प्रमुख नेते उपस्थित होते.

अजित पवार म्हणाले, की शुक्रवारी मी सद्सदविवेकबुद्धीला स्मरून राजीनामा दिला. माझ्या सहकाऱ्यांना याचा वेदना झाल्या. यापूर्वीही असा प्रसंग माझ्यावर आला होता. मी सगळ्यांना विश्वासात न घेता हे केल्याने सर्वांची माफी मागतो. सर्वांना अडचणीत आणण्याची भूमिका योग्य आहे, का ही भूमिका माझ्या मनात येत होती. हरिभाई बागडेंना तीन दिवसांपूर्वी फोन केला होता. ती चूक होती का हे माहिती नाही. 1088 कोटींची अनियमितता झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. 25 हजार कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचे सांगण्यात आले. 12 कोटींच्या ठेवी असलेल्या बँकेत 25 हजार कोटींचा भ्रष्टाचार कसा होईल. गेल्या तीस वर्षांपासून मी बारामतीचे प्रतिनिधित्व करत आहे. सहकारी संस्था आम्ही व्यवस्थित चालविल्या आहेत. नियम डावलून कधीच काही केले नाही. ठेवीच्या तुलनेत जास्त भ्रष्टाचार कसा काय? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चार साखर कारखान्यांना कशी मदत केली. एनपीए असताना फडणवीसांकडून कशी काय मदत केली जाते. नियम डावलून मदत करण्यात आली. शरद पवार हे कुठल्याही सहकारी संस्थेशी संबंधित नाहीत. असे असताना शरद पवारांचे नाव घेतले जाते. वाहिन्यांवर सतत शरद पवार आणि अजित पवार यांचेच नाव झळकले जाते.

संजय राऊत शरद पवारांच्या भेटीला, काय असेल कारण...

आपल्यामुळे शरद पवार यांची बदनामी होते. त्यामुळे खूप अस्वस्थ झालो. राजीनामा देण्याचा मी विचार करत होतो. आपल्यामुळे साहेबांना बदनामी सहन करावी लागत आहे. यातूनच मी शरद पवारांना न सांगता राजीनामा दिला. राजीनामा दिल्यानंतर मी फोन बंद केला आणि मुंबईतच होतो.

loading image
go to top