Gunratna Sadawarte Police Custody I सदावर्तेंना न्यायालयाचा दणका, पवारांच्या घरावरील हल्ल्याप्रकरणी पोलिस कोठडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सदावर्तेंना न्यायालयाचा दणका, चार दिवसांची पोलिस कोठडी

सदावर्ते यांच्या भाषणामुळे सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न - सरकार वकील

सदावर्तेंना न्यायालयाचा दणका, चार दिवसांची पोलिस कोठडी

शरद पवार यांच्या घरावर हल्ल्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदार्ते यांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, साताऱ्यातील छत्रपती घराण्यावर टीका केल्याप्रकरणी सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळे आज सातारा जिल्हा व सत्र न्यायालयात गुणरत्न सदावर्ते यांना हजर करण्यात आले. न्यायालयाकडून त्यांना चार दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे. या सुनावणी दरम्यान, सरकारी वकीलांकडून सदावर्ते यांना पोलिस कोठडी द्यावी अशी मागणीही करण्यात आली होती.

हेही वाचा: पवारांच्या घरावर हल्ला : सदावर्ते आणखी अडचणीत! पत्नीविरोधात गुन्हा दाखल

काल सातारा पोलिसांनी गुणरत्न सदावर्ते यांना ऑर्थररोड तुरुंगातून (Gunratna Sadavarte) सातारा (satara) न्यायालयात (court) हजर केले आहे. या सुनावणी दरम्यान, सरकारी वकील यांनी सदावर्ते यांना पोलिस कोठडी द्यावी अशी मागणी केली आहे. सदावर्ते यांच्या भाषणामुळे सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न झाला असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. ॲाक्टोबर २०२० मध्ये सातारा शहर पोलिस ठाण्यात मराठा आरक्षणाप्रकरणी एका वृत्तवाहिनीवरती आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबाबत गुन्ह्यात गुणरत्न सदावर्ते यांना सातारा पोलिसांनी गुरुवारी मुंबईतून ताब्यात घेतलं. छत्रपती घराण्यावर टीका केल्याप्रकरणी सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा: मुश्रीफांच्या वाढदिवसाच्या पोस्टरवरुन वाद, राजकारण तापणार?

दरम्यान, सदावर्तेंना कोर्टात हजर केल्यावर कोणाबाबत तक्रार आहे का असं विचारल्यानंतर नाही असं स्पष्ट केलं आहे. अटकेत असलेल्या सदावर्तेंचे वकिल महेश वासवानी मुंबईला गेल्यामुळे वकिल सचिन थोरात, वकिल सतिष सुर्यवंशी, वकिल प्रदीप डोरे यांनी सदावर्तेंची बाजू मांडली आहे. त्यांच्या नोटीसचा कालावधी संपला असून सदावर्तेंना ताब्यात घेणंच कायद्यात बसत नसल्याचं सांगितलं आहे. घटनास्थळाचा पंचनामा करण्यासाठी पोलिस कोठडी मिळावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.

दरम्यान, आज न्यायालयात स्वतः गुणरत्न सदवरर्तेंनी ऑर्ग्युमेंट केली आहे. सरकारी पक्षाच्या वकील अंजुम पठाण यांनी सदावर्तेंच म्हणणं खोडून काढल आहे. यावेळे जोरदार युक्तिवाद झाला. बाकीच्या गुन्ह्यांबद्दल काय झालं ते इथे बोलू नका या गुन्ह्याबाबत बोला असंही अंजुम पठाण म्हणाले आहेत. यावेळी सदारर्ते म्हणाले, हे प्रकरण पोलिसांना गांभीर्याने घ्यायचे होते तर मागील 2 वर्षांपासून पोलिसांनी काय केले. या पाठीमागे राजकीय हस्तक्षेप असल्याचं मत त्यांनी मांडलं आहे, असंही त्यांनी खडसावून सांगितलं आहे.

Web Title: Sharad Pawar House Attack Case Court Gave 4 Days Police Custody To Gunratna Sadawarte

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..