esakal | Solapur Muncipal Election : नेतृत्वावरून राष्ट्रवादीत धुसफूस? शरद पवार आज घेणार निर्णय
sakal

बोलून बातमी शोधा

sharad pawar

सोलापूर महापालिका निवडणूक नेतृत्वाबाबत शरद पवार घेणार निर्णय

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

सोलापूर : निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) आज सोलापूर (solapur) शहराच्या दौऱ्यावर येत आहेत. सोलापूर महापालिका निवडणूक कुणाच्या नेतृत्वात लढणार? यावर फायनल निर्णय शरद पवार घेणार असून शिवसेनेचे महेश कोठे आज पवारांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेशाची शक्यता आहे. दरम्यान तालुका व जिल्हा कार्यकारिणीत बदल करत असताना व नव्या नेतृत्वाला संधी देताना जुन्यांनाच संधी देण्यावर भर दिल्यामुळे राष्ट्रवादीत धुसफूस वाढली आहे. त्यातूनच शहरातील काही प्रमुख पदाधिकाऱ्यांनी थेट शरद पवार यांच्याकडे तक्रार केली होती. त्यामुळे तालुक्‍यातील राष्ट्रवादीमध्ये दोन गट असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे.

कोठेंचा पक्ष प्रवेश; राष्ट्रवादीची ताकद वाढणार?

शिवसेनेचे महेश कोठे आज पवारांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेशाची शक्यता आहे. यामुळे आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढणार आहे. महेश कोठे यांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिका निवडणुका लढविली जाणार असल्याची शक्यता आहे. मात्र याला पक्षातील ज्येष्ठ नेत्यांचा विरोध नसला तरी नाराजी आहे. यावर आज पवार निर्णय घेणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. पवारांच्या दौऱ्यात नगरसेवक महेश कोठे यांचा रखडलेल्या पक्ष प्रवेश होण्याची शक्यता वर्तविली जात होती. मात्र, पवारांचा 2 सप्टेंबर रोजीचा दौरा रद्द झाल्याने कोठे यांचा राष्ट्रवादी प्रवेशही रखडला होता. शिवसेनेचे नगरसेवक महेश कोठे यांना विभागीय आयुक्तांनी अपक्ष नगरसेवक मान्यता दिली आहे. यामुळे राष्ट्रवादीच्या वाटेवर असताना पक्षबदल झाल्यानंतरही नगरसेवक पद अबाधित राहणार आहे. पूर्वी काँग्रेस तर आता शिवसेनेचे नगरसेवक असलेले महेश कोठे हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याने आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढणार आहे.

हेही वाचा: Corona: दिवसाला पाच लाख रुग्ण हाताळण्याची क्षमता; सरकारचा छातीठोक दावा

राष्ट्रवादीतील गटबाजी येतेय उफाळून!

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सामोरे जाण्याच्या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) जिल्हा नेतृत्वाने जिल्हा व तालुका कार्यकारिणीत बदल केला. परंतु, या पदाधिकारी निवडीवरून राष्ट्रवादीच्या दुसऱ्या गटाने अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याकडे तक्रार केल्यामुळे राष्ट्रवादीतील गटबाजी उफाळून येत असल्याचे स्पष्ट झाले आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुक्‍यातील राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी भाजपला जवळ करत भाजप उमेदवाराचा प्रचार केला. त्यामुळे मोजक्‍याच राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांच्या जोरावर 2019 विधानसभेची जागा राष्ट्रवादीने पटकावली. परंतु (स्व.) भारत भालके यांच्या अकाली निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत गेलेल्या अनेक राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी पुन्हा राष्ट्रवादीचे सारथ्य केले. परंतु ही जागा जिंकण्यात अपयश आले. त्यामागील कारणे अनेक असली तरी येत्या चार महिन्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेतील नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या निवडणुकांना सामोरे जात असताना राष्ट्रवादीने देखील मजबूत बांधणी करणे आवश्‍यक आहे. म्हणून तालुका व जिल्हा कार्यकारिणीत बदल करत असताना व नव्या नेतृत्वाला संधी देताना जुन्यांनाच संधी देण्यावर भर दिल्यामुळे राष्ट्रवादीत धुसफूस वाढली आहे. त्यातूनच शहरातील काही प्रमुख पदाधिकाऱ्यांनी थेट शरद पवार यांच्याकडे तक्रार केली. त्यामुळे तालुक्‍यातील राष्ट्रवादीमध्ये दोन गट असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे.

हेही वाचा: ...अन् भल्या पहाटे अजित पवार धरणाच्या मधोमध अडकले!

सोलापूर महापालिका पक्षीय बलाबल

• भाजप 49
• शिवसेना 21,
• काँग्रेस 14
• राष्ट्रवादी 04
• MIM – 08
• माकप – 01
• अपक्ष/इतर – 04
• रिक्त – 01
• एकूण = 102

loading image
go to top