Sanjay Raut on Sharad Pawar: अजित पवारांविरोधात शरद पवारांचा 'गनिमी कावा'; संजय राऊतांचा मोठा दावा

शरद पवारांनी शुक्रवारी बारामतीचा दौरा केल्यानंतर राऊतांनी हा दावा केला आहे, ते असं का म्हणालेत? जाणून घ्या
MP Sanjay Raut On NCP Chief Sharad Pawar attending opposition meeting in Bengaluru tomorrow
MP Sanjay Raut On NCP Chief Sharad Pawar attending opposition meeting in Bengaluru tomorrow

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार हे अजित पवारांच्या गटाविरोधात 'गनिमी कावा' रणनिती वापरत आहेत, असा दावा ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. शुक्रवारी बारामतीतील दौऱ्यादरम्यान पवारांनी केलेल्या विधानावर राऊतांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. (Sharad Pawar is using guerilla warfare tactics against Ajit Pawar says Sanjay Raut)

MP Sanjay Raut On NCP Chief Sharad Pawar attending opposition meeting in Bengaluru tomorrow
Chandrayaan 3: चंद्रावरील 'शिवशक्ती', 'जवाहर' पॉईंटवरुन जुंपली; काँग्रेसच्या विधानावर भाजपचा पलटवार

शरद पवारांनी शुक्रवारी बारामतीत बोलताना म्हटलं की, "राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी वेगळी राजकीय भूमिका घेत पक्ष सोडला" पण त्यांनी याला फूट असं म्हटलेलं नाही. पण अजित पवार हे आमचे नेते आहेत त्यात कुठलीही शंका नाही, असं एक दिवस आगोदर खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलं होतं. यापार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी शनिवारी भाष्य केलं. (Marathi Tajya Batmya)

MP Sanjay Raut On NCP Chief Sharad Pawar attending opposition meeting in Bengaluru tomorrow
भगतसिंह कोश्यारींना का येते अजित पवारांची दया? राज्यपालपद स्वीकारण्याचं देखील सांगितलं कारण

युद्धात विविध रणनीती खेळाव्या लागतात. शिवसेनेनं यासाठी थेट मैदानात उतरुन लढायचं ठरवलं आहे. ज्यांनी आमच्यावर अन्याय केला आणि फसवणूक केली त्यांच्याशी छत्रपती शिवाजी महाराजांची शिवसेना रणांगणावर लढत आहे, असंही राऊत यांनी म्हटलं आहे. (Latest Marathi News)

MP Sanjay Raut On NCP Chief Sharad Pawar attending opposition meeting in Bengaluru tomorrow
Nashik Crime: प्रसुतीसाठी ‘सिव्हिल’मध्ये आली अन्‌...; पतीविरोधात पोक्सोअन्वये बलात्काराचा गुन्हा दाखल

दरम्यान, शरद पवारांच्या बारामतीतील विधानावर राऊत म्हणाले, "शरद पवारांच्या भूमिकेवरुन कुठलाही संभ्रम नाही. मी शरद पवारांचं विधान ऐकलं आहे. पक्षात कुठलीही फूट पडलेली नाही, असं त्यांनी म्हटलंय पण अजित पवार आमचे नेते आहेत असं त्यांनी कुठेही म्हटलेलं नाही. शरद पवार हे महाराष्ट्राच्या आणि देशातल्या राजकारणातील भीष्म पितामह आहेत, त्यांचं देशात वजन आहे. महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडी सोबत ते आहेत, यात कसलाही संभ्रम नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com