शरद पवार यांची भूमिका काय?

टीम ई-सकाळ
शनिवार, 23 नोव्हेंबर 2019

गेले महिनाभर महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय उलथापालथीत पवार यांची भूमिका केंद्रस्थानी होती. तिन्ही पक्ष एकत्र आणण्यापासून ते काल (शुक्रवारी) उद्धव ठाकरे यांच्या नावावर सर्वांची माहिती असल्याचे सांगण्यापर्यंत पवार यांनी काम केले होते. 

महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात घडलेल्या धक्कादायक सरकार स्थापनेमागे नेमके कोण, याबद्दल राज्यभर उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार यांची नेमकी भूमिका सकाळी नऊपर्यंत समजलेली नव्हती. राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने कोणीही प्रतिक्रियेसाठी उपलब्ध झालेले नव्हते. 

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

गेले महिनाभर महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय उलथापालथीत पवार यांची भूमिका केंद्रस्थानी होती. तिन्ही पक्ष एकत्र आणण्यापासून ते काल (शुक्रवारी) उद्धव ठाकरे यांच्या नावावर सर्वांची माहिती असल्याचे सांगण्यापर्यंत पवार यांनी काम केले होते. 

महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप; देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री, अजित पवार उपमुख्यमंत्री

महाराष्ट्राचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच असेल, असे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना आपण वचन दिल्याचे उद्धव यांनी अलिकडे सांगितले होते. भाजपसोबत युती करून शिवसेनेने निवडणूक लढविली होती. युती म्हणून बहुमताएवढ्या जागा मिळाल्या तरीही मुख्यमंत्रीपदावरून भाजप आणि शिवसेनेत तणाव निर्माण झाला. त्याची परिणीती राज्याचा राजकीय भुगोल बदलण्यात झाली. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस असे तिन्ही पक्ष एकत्र झाले. या एकीकरणातून नवी आघाडी जन्मला आली आणि या आघाडीचे नेतृत्व उद्धव यांनीच करावे, असे पवार यांनी कालच्या तिन्ही पक्षांच्या संयुक्त बैठकीनंतर सुचविले होते. 

अजित पवारांनी आमच्यासोबत यायचा निर्णय घेतला : फडणवीस

संसदेचे अधिवेशन सुरू झाल्यानंतर पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 45 मिनिटे भेट घेतली होती. त्या भेटीची पार्श्वभूमी आजच्या शपथविधीमागे आहे का, याबद्दल चर्चा सुरू झाली आहे. ही भेट महाराष्ट्रातील शेतकऱयांच्या प्रश्नांवर होती, असे पवार यांनी सांगितले होते. मात्र, 45 मिनिटे फक्त शेतकरी प्रश्नावर चर्चा झाली आणि महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर काही बोलणे झालेच नाही, यावर राजकीय वर्तुळात विश्वास नव्हता. 

मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीवेळी अजित पवार यांचे पूत्र पार्थ पवार उपस्थित होते. राष्ट्रवादीचे अन्य नेते नव्हते. याचा अर्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला आहे का हा प्रश्न उपस्थित झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील मोठा गट अजित पवारांबरोबर असल्याचे सांगितले जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sharad Pawar major role in Maharashtra politics after BJP form government