
बारामती: व्यक्तिगत जीवनात आधार लागतो, त्यामुळे आता जास्त लांबवू नका आम्हाला अक्षता टाकायच्या आहेत, असे मिश्किलपणे हसत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी युगेंद्र पवार यांना आता दोनाचे चार हात करा, असा सल्ला दिला.
युगेंद्र पवार यांचा मंगळवारी (ता. 22) वाढदिवस होता. अनेक कार्यकर्त्यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत केक कापावा, अशी विनंती शरद पवार यांना केली होती. ती मान्य करत त्यांनी नातवाचा वाढदिवस त्याला शुभेच्छा देत साजरा केला.