Sharad Pawar’s major revelation in Nagpur press conference creates political buzz in Maharashtra: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्या उपस्थितीत आज नागपूरात मंडल यात्रेचा शुभारंभ झाला. याप्रसंगी शरद पवारांनी पत्रकारपरिषेदत बोलताना विविध मुद्य्यांवर भूमिका मांडली. तसेच यावेळी शरद पवारांन एक मोठा गौप्यस्फोटही केला.
शरद पवार म्हणाले, विधानसभा निवडणुकीआधी दोन माणसं भेटायला आली होती. त्यांच्याकडून १६० जागा जिंकून देण्याची गॅरेंटी देण्यात आली होती. त्या दोन व्यक्तींची राहुल गांधी यांच्यासोबत भेट घालून दिली होती. त्यावेळी यामध्ये आपण पडायला नको, असे आम्ही ठरवलं. ज्यामुळे आता राजकीय वर्तुळात ती दोन माणसे नेमकी कोण याबाबत चर्चांना उधाण आलं आहे.
शरद पवार यावेळी त्यांनी ठाकरे बंधूंची युती आणि राहुल गांधींच्या आरोपांवरही भाष्य केले. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या युतीवर बोलताना पवार म्हणाले की यावर आता ठोस बोलताना येणार नाही, आम्ही चर्चा करू. तर राहुल गांधींचे मतचोरीचे आरोप संशय घेणारे आहेत. राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेला मीही उपस्थित होतो. राहुल गांधींच्या आरोपाला आयोगाने उत्तर द्यावे.
राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा बिहारमधील मतदार यादी पूनसर्वेक्षणावरून निवडणूक आयोगाला लक्ष्य केलं आहे. राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत थेट पुरावेच सादर केले होते. यावेळी त्यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत घोळ झाल्याचाही आरोप त्यांनी केला होता. तसेच अनेक निवडणुकीत एका व्यक्तीने तीन वेळा मतदान केल्याचंही त्यांनी म्हटलेलं आहे. राहुल गांधींच्या या आरोपानंतर आता राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.