
Brother Receives Rakhi from Late Sister: देशभरात सर्वत्र रक्षाबंधन सण साजरा केला जात आहे. परंतु वलसाडमधील एका कुटुंबात रक्षाबंधन वेगळ्या पद्धतीने साजरे करण्यात आले. ज्यांनी हे अनोखे रक्षाबंधन पाहिले त्यांच्या डोळ्यात अक्षरशा पाणी आले. जर तुम्हीही ही बातमी वाचली तर तुमच्या डोळ्यात आपसूकच पाणी येईल. खरंतर, वलसाडमध्ये एका भावाला त्याच्या बहिणीच्या हातांनी तर राखी बांधली खरी, परंतु ती बहीण आज या जगात नाही. त्या बहिणीचा मृत्यू सप्टेंबर २०२४ मध्येच झाला होता.
ही कहानी वलसाडमधील लहान मुलगी रिया आणि तिच्या ब्रेन डेड शरीरच्या अवयवांच्या दानाने प्रज्वलित झालेल्या जीवनदानाच्या ज्योतीबद्दल आहे. रियाचे हात मुंबईतील १५ वर्षीय अनमता अहमद हिला यशस्वीरित्या प्रत्यारोपित करण्यात आले होते. दोन वर्षांपूर्वी, विजेच्या धक्क्यामुळे अनमता हिचा एक हात कापावा लागला होता. गोरेगावमध्ये राहणाऱ्या ११ वीची विद्यार्थिनी अनमता हिला यामुळे अनेक मानसिक आणि शारीरिक समस्यांना तोंड द्यावे लागले. पण, रियाचा हात मिळाल्यानंतर, अनमताच्या आयुष्यातील हे दु:ख दूर झाले.
त्यानंतर या वर्षी रक्षाबंधनाच्या सणाला, अनमता अहमद ही रियाकडून मिळालेल्या हाताने रियाचा भाऊ शिवमच्या मनगटावर राखी बांधण्यासाठी वलसाडला आली होती. या दरम्यान, खूप भावनिक वातावरण तयार झाले. जेव्हा शिवमने अनमताच्या हाताने राखी बांधली तेव्हा त्याला असे वाटले की जणू तो त्याची प्रिय बहीण रियाकडून राखी बांधत आहे.
वलसाडमधील एका शाळेत दहावीत शिकणाऱ्या शिवमला पुन्हा एकदा आपल्या लाडक्या लहान बहिणीच्या हाताला स्पर्श केल्यासारखे वाटले. रियाच्या पालकांनाही त्यांच्या स्वतःच्या मुलीचा हात हातात घेतल्याची भावना जाणवली. जणू ते त्यांच्या लहान रियाला समोरासमोर भेटत आहेत. त्यांनी अनमताला अक्षरशा मिठी मारली, तेव्हा त्यांच्या डोळ्यात पाणी आले आणि उपस्थित सर्वांचेच डोळे पाणवले.
रियाचे मृत शरीर अनेक लोकांच्या आयुष्यात नवीन रंग भरण्यास सक्षम होते आणि रियाची पालक आई आणि वलसाडच्या प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. उषाबेन मशरी यांनाही हे समजले. डॉ. उषाबेन मशरी आणि डोनेटलाइफचे संस्थापक निलेशभाई मांडलेवाला यांनी रियाच्या पालकांना हे समजावून सांगितले आणि त्यांना रियाचे अवयव दान करण्यास तयार केले.
रियाचे मूत्रपिंड, यकृत, फुफ्फुसे, डोळे, लहान आतडे आणि दोन्ही हात दान करण्यात आले. डोनेटलाइफच्या अथक प्रयत्नांनी गरजूंना हे अवयव वेळेवर पोहोचवण्यासाठी सर्व तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाल्या. तो गणेश विसर्जनाचा दिवस होता, जणू काही बाप्पाने रियाचा पवित्र आत्मा स्वतःमध्ये सामावून घेतला आणि तिच्या दान केलेल्या अवयवांद्वारे इतरांचे जीवन नवीन प्रकाशाने भरले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.