esakal | ...म्हणून शरद पवार, नितीन गडकरी येणार एकाच मंचावर! भाजप नेत्यांकडून स्पष्ट
sakal

बोलून बातमी शोधा

sharad pawar

शरद पवार, नितीन गडकरी येणार एकाच मंचावर! कारण असे की....

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

अहमदनगर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) व केंद्रीय रस्ते वाहतूक व परिवहनमंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) या दोन मातब्बर नेत्यांसह शिवसेना, (shivsena) भाजप,(BJP) राष्ट्रवादी (NCP) व कॉँग्रेस (Congress) पक्षाचे प्रमुख नेते पहिल्यांदाच एका मंचावर येत आहेत.

दोन मातब्बर नेत्यांसह प्रमुख नेत्यांची उपस्थिती; भाजप नेते सांगतात...

जिल्ह्यात पवार व गडकरी या दोन मातब्बर नेत्यांसह शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी व कॉँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते पहिल्यांदाच एका मंचावर येत आहेत. गेल्या आठवड्यात पुण्यात झालेल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या काही नेत्यांना सोबत घेण्यात आले होते. आता नगरमध्ये होणाऱ्या अशाच एका कार्यक्रमात गडकरी आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार एका व्यासपीठावर येत आहेत. राष्ट्रीय रस्ते विकास प्राधिकरण आणि स्थानिक भाजप शाखेच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाला पवार यांना बोलविण्याची सूचना स्वत: गडकरी यांनीच केल्याचे सांगण्यात आले.

गडकरींच्या सूचनेनुसारच पवार यांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित

गडकरी यांच्या पुढाकाराने रस्त्यांची कामे होत आहेत, अशी माहिती भाजपचे नगर शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र तथा भय्या गंधे यांनी दिली. पवार व गडकरी यांच्या एकत्र येण्याबद्दल गंधेंना विचारले असता, ते म्हणतात, ‘विकासकामे करताना राजकारण आणि पक्षीय मतभेद दूर ठेवावेत. सर्वांना सोबत घेऊन काम करावे, ही गडकरी यांची पद्धत आहे. त्यानुसार हा कार्यक्रम होत आहे.’. गडकरी यांच्या सूचनेनुसारच पवार यांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे.

हेही वाचा: आखातात पोचली नेवाशाची डाळिंबे

भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्यासाठी एकत्र

पुण्यात झालेल्या कार्यक्रमात गडकरी यांनी अनेक महामार्ग, मेट्रो तसेच नव्या शहरांचीही संकल्पना मांडली होती. त्यामध्ये पुण्याचे विस्तारीत शहर आणि औद्योगिक हब नगर जिल्ह्यात उभारले जाऊ शकते, असेही गडकरी यांनी सूचविले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व केंद्रीय रस्ते वाहतूक व परिवहनमंत्री नितीन गडकरी शनिवारी (दोन ऑक्टोबर) रस्ताकामाचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्यासाठी नगरला येत आहेत. केडगावजवळील सोनेवाडी रस्त्यावर होणाऱ्या कार्यक्रमात ते एकाच व्यासपीठावर असतील. नगर-करमाळा-टेंभुर्णी या चौपदरी रस्त्यासाठी १२ कोटी, सावळीविहीर ते अहमदनगर रस्त्याच्या रुंदीकरणासाठी ४९६ कोटी, अहमदनगर- भिंगार या १८ किलोमीटर रस्तारुंदीकरणासाठी ३५ कोटी रुपये, तर राष्ट्रीय राखीव निधीमधील कामांसाठी ८४ कोटी रुपये खर्च होत आहे. या कामांचे भूमिपूजन होणार आहे. अहमदनगर-दौड-वासुंदे फाटा रस्ता मजबुतीकरण, अहमदनगर-कडा-आष्टी-जामखेड रस्ता मजबुतीकरण, नांदूर शिंगोटे ते कोल्हार रस्ता मजबुतीकरण व कोपरगाव-वैजापूर रस्ता मजबुतीकरणाची कामे पूर्ण झाली असून, त्यांचा लोकार्पण सोहळा होणार आहे. केडगावजवळील सोनेवाडी रस्त्यावरील श्रेया गार्डन येथे मुख्य कार्यक्रम होत आहे.

हेही वाचा: राज्य सरकारच्या घोषणा कागदावरच, पंचनाम्याआधी मदत करा- फडणवीस

loading image
go to top