Sharad Pawar: पत्नीवर कारवाई न झाल्याने माथेफिरूने दिली थेट पवारांनाच जीवे मारण्याची धमकी; आता पोलिसांनी... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sharad Pawar

Sharad Pawar: पत्नीवर कारवाई न झाल्याने माथेफिरूने दिली थेट पवारांनाच जीवे मारण्याची धमकी; आता पोलिसांनी...

राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी काल देण्यात आली होती. पवारांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी अज्ञात व्यक्तीनं फोन करून शरद पवारांना ठार मारण्याची धमकी दिल्यानं खळबळ उडाली त्यानंतर पोलिसांनी धमकी देणाऱ्याचा शोध सुरू केला होता. त्यानंतर आज धमकी देणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे.

शरद पवार यांना धमकी देणाऱ्या व्यक्तीला बिहारमधून अटक करण्यात आली आहे. आरोपी नारायण कुमार सोनी याला घेऊन पोलिस महाराष्ट्राकडे रवाना होत आहेत. दुसऱ्या व्यक्तीशी लग्न करणाऱ्या पत्नीवर कारवाई न झाल्याने शरद पवार यांना धमकी दिल्याची माहिती समोर आली आहे.

हेही वाचा: Sharad Pawar : राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांना धमकीचा फोन

शरद पवार यांनी यासंबधी तक्रात मुंबई पोलिस आयुक्त यांच्याकडे केली होती. काल फोनवरून धमकी देणारा व्यक्ती हिंदीतून बोलत होता. शरद पवारांचा परवा वाढदिवस साजरा झाला. त्यानंतर त्यांची हत्या करण्याबाबत धमकीचा फोन आल्यानंतर पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्यानं घेतलं होतं.

हेही वाचा: Ajit Pawar : शरद पवारांना जीवे मारण्याच्या धमकीनंतर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

टॅग्स :Sharad Pawarmumbai police