Sharad Pawar: ...अन् शरद पवारांनी केले शाहंचे कौतुक; चर्चेला उधाण

केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांच्या दौऱ्याबाबत बोलताना पवार म्हणाले...
Sharad Pawar praised Amit Shah Pune maharashtra politics
Sharad Pawar praised Amit Shah Pune maharashtra politics

केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला देण्याचा निर्णय घेतल्यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. मात्र, या वादात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यात सध्या सुरू असलेल्या वादात मी पडणार नाही, अशी भूमिका स्पष्ट केली. तर दुसरीकडे त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे कौतुक केले. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं. (Sharad Pawar praised Amit Shah Pune maharashtra politics )

शरद पवार माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी अमित शाहा यांच्या दौऱ्याबाबत भाष्य केलं. 'सहकार परिषदेच्या समारंभासाठी शाह पुण्यात आले होते. सहकार परिषदेचं उद्घाटन माझ्या हस्ते पार पडलं. त्यामुळे आमच्यात कोणतेही मतभेद नाही. धोरणात्मक विषयांवर आणि सविस्तर चर्चा केली. त्यांनी केलेल्या भाषणातील मुद्दे आज योग्य वाटले. ' अशी प्रतिक्रिया पवार यांनी दिली आहे.

काय म्हणालेत अमित शाह?

सकाळतर्फे आयोजित दोन दिवसांच्या सहकार आणि बॅकिंग परिषदेचा समारोप शहा यांच्या उपस्थितीत झाला. सहकार खात्याचा कार्यभार घेतल्यापासून सहकार मंत्री म्हणून शहा यांचे पुण्यात पहिल्यांदाच भाषण झाले.

शहा यांना सायंकाळी ५ वाजून २० मिनिटांनी भाषण सुरू केले आणि पुढील ३८ मिनिटे त्यांनी सगळ्यांना अक्षरशः खिळवून ठेवले. सहकार क्षेत्रात गेल्या ३० वर्षांपासून कार्यरत असल्याचे सांगत, शहा यांनी सुरवात केली.

सहकार क्षेत्रात या पूर्वी चुका काय झाल्या, केंद्र सरकारने त्यांचा विचार करून कोणत्या उपाययोजना केल्या, भविष्यातील नियोजन काय आहे, त्यातून शेतकऱ्यांना फायदा कसा होणार, त्याचा त्यांच्या दैनंदिन जीवनावर कसा परिणाम होणार आणि सहकार क्षेत्राची भरभराटीचे उद्दिष्ट साध्य कसे करणार, याचे विवेचन त्यांनी नेटकेपणाने मांडले.

राज्यात एकेकाळी सहकारी साखर कारखान्यांची संख्या जास्त होती, आता ती निम्म्यावर आली आहे आणि खासगी साखर कारखान्यांची संख्या दुपटीपेक्षा अधिक झाली आहे.

सहकारी बॅंकांना चुकीच्या पद्धतीने कर्ज वाटप केल्यामुळे राज्यातील अनेक सहकारी बॅंका रसतळाला गेल्या, हे सांगताना त्यांनी पुण्यातील रूपी सहकारी बॅंकेचाही दाखला दिला.

संचालक मंडळातील काही प्रकारच्या व्यक्तिंमुळे बॅकांचेच नव्हे तर, सहकार खात्याचे नुकसान होत असल्याचे सांगताना त्यांनी कोणत्याही नेत्याचा नामोल्लेख करता, त्या व्यक्ती तुम्हाला माहिती आहेत, असे सांगितले. कार्यक्रमाच्या ठिकाणी नियोजीत वेळेपेक्षा पोचण्यास विलंब झाल्याचे लक्षात ठेवत शहा यांनी समारोप करताना आवर्जुन दिलगिरीही व्यक्त केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com