
Sharad Pawar : अजित पवारांना पद का दिलं नाही?, शरद पवारांनी स्पष्ट सांगितलं
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (NCP) मध्ये सर्वात मोठा बदल करण्यात आला आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. शरद पवार यांनी दिल्लीत ही घोषणा केली. सुप्रिया यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या प्रमुखपदीही करण्यात आले आहे. पक्षाचा हा निर्णय ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्यासाठी धक्का मानला जात आहे.
शरद पवार यांनी यावर भाष्य केले आहे. आज त्यांनी पत्रकार परिषद घेतली. शरद पवार म्हणाले चर्चेतून सहकाऱ्यांना जबाबदारी देण्याचा निर्णय घेतला. महिन्यात ४ वेळा इतर राज्यातील संघटना वाढवण्याची जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आली आहे.
२३ जूनला पाटनामध्ये विरोधकांची सभा आहे. भाजपची ताकद जास्त असणाऱ्या ठिकाणी विरोधकांना एकत्र आणणार आहोत. लोकसभा निवडणुकीसाठी चर्चा होणार आहे, असे शरद पवार म्हणाले.
पुढील पक्षाध्यक्ष कोण -
कार्यकारी अध्यक्ष पुढील अध्यक्ष होणार का? यावर शरद पवार म्हणाले, लोक आग्रहास्तव सुप्रिया सुळे यांना कार्याध्यक्षा करण्यात आले आले. इतर सहकाऱ्यांवर जबाबदारी देण्याचा निर्णय आधीच केला होता.
पक्षाध्यक्षाची जागा खाली नाही जेव्हा जागा खाली होईल तेव्हा बघू. अजित पवार नाराज असल्याची बातमी खरी नाही. जयंत पाटील आज प्रदेशाध्यक्ष आहेत. अजित पवार विरोधीपक्षनेते आहेत. त्यांच्यावर मोठी जबाबदारी आहे. त्यांच्यावर आधीच जबाबदारी आहे. अजित पवार नाराज नाहीत, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.
शरद पवारांनी दिला होता राजीनामा -
नुकतेच शरद पवार यांनी पक्षप्रमुखपदाची जबाबदारी सोडण्याची घोषणा केली होती. मात्र, कार्यकर्त्यांची नाराजी आणि नेत्यांच्या समजूतीनंतर त्यांनी आपला निर्णय मागे घेतला होता. पवार यांच्या प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीने ५ मे रोजी त्यांचा राजीनामा स्वीकारण्यास नकार दिला होता आणि त्यांना पक्षाध्यक्षपदी कायम राहण्याची विनंती केली होती. आता पक्षाच्या हायकमांडने दोन नवीन कार्याध्यक्षांची नियुक्ती करून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.