

Sharad Pawar Demands CM Probe into Pune Land Scam
Sakal
अकोला : ‘‘राज्यात अशाप्रकारे जमिनीची खरेदी होत असेल तर हा गंभीर प्रकार आहे,’’ असे सांगत पुण्यातील कथित जमीन गैरव्यवहारप्रकरणी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज ‘मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची चौकशी करून वस्तुस्थिती समाजासमोर ठेवावी,’ असे स्पष्ट केले. या प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांचे नाव पुढे आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकरणाची गंभीर दखल घेत दोषींवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला होता.