Owaisi Statement on NCP : एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी शरद पवार यांच्या राज्यसभा खासदारकीबाबत मोठं विधान केलंय. शरद पवार यांच्याकडे आता ताकदच कुठं आहे, आता ते राज्यसभेत कसे जाणार असा सवाल ओवैसी यांनी विचारला आहे. यंदा वर्षभरात महाराष्ट्रातील सात राज्यसभा खासदारांचा कार्यकाळ संपणार आहे. यात शरद पवार यांचाही समावेश आहे. यावरून ओवैसी यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधलाय. येत्या काळात मोठा तमाशा होणार असल्याचंही ओवैसी म्हणालेत.