Sharad Pawar: कोणाच्या कोंबड्यामुळं दिवस उगवला यानं...; भाजपच्या माघारीवर पवारांचा टोला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sharad Pawar: कोणाच्या कोंबड्यामुळं दिवस उगवला यानं...; भाजपच्या माघारीवर पवारांचा टोला

Sharad Pawar: कोणाच्या कोंबड्यामुळं दिवस उगवला यानं...; भाजपच्या माघारीवर पवारांचा टोला

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतील भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांनी आज उमेदवारी अर्ज मागे घेतला. मुरजी पटेल यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर भाजपच्या या निर्णयाचे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले. राज ठाकरे यांच्यापाठोपाठ राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही भाजपच्या निर्णयाचे स्वागत केलंय. कुणाच्याही कोंबड्यांनी दिवस उगवला तरी माझी काही हरकत नाही, असंही शरद पवार म्हणालेत. शरद पवार यांनी मध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.

पुढे बोलताना पवार म्हणाले की, मुरजी पटेल यांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावा, अशी माझी मागणी नव्हती. मी मागणी कशी करणार? मी फक्त भाजपला तसं सूचवलं होतं. सूचवल्यानंतर त्यातून सकारात्मक निर्णय घेतला जाईल याची मला खात्री होती. तो सकारात्मक निर्णय त्यांनी घेतला. एकदा निर्णय झाल्यानंतर त्याच्या खोलात मी जात नाही. त्यामुळे आता त्यावर अधिक चर्चा करण्यात अर्थ नाही, असंही शरद पवार म्हणाले आहेत.

हेही वाचा: Andheri Byelection: शरद पवारांनी राज ठाकरेंच्या पत्रातील हवा काढून घेतली का?

भाजपने उमेदवारी अर्ज मागे घेतला त्याचं श्रेय ते राज ठाकरे यांना देत आहेत. या संदर्भात पवारांना विचारलं असता त्यांनी मिश्किलपने म्हंटलं की, कुणाच्याही कोंबड्यांनी दिवस उगवला तरी माझी हरकत नाही, असंही पवार यावेळी म्हणाले आहेत.

हेही वाचा: मविआत पुन्हा बिघाडी? MCA निवडणुकीत पवार-शेलार युतीनंतर पटोले नाराज