Jayant Patil : राष्ट्रवादीतून भाजपमध्ये जाण्यास इच्छूक असलेल्यांची संख्या मर्यादित; पाटलांचा गौप्यस्फोट

jayant patil maharashtra politics
jayant patil maharashtra politics Esakal
Updated on

मुंबईः शरद पवार यांनी घेतलेला निवृत्तीचा निर्णय आज मागे घेतला. त्यांच्या भूमिकांचे अनेक अर्थ काढले जात आहेत. विशेषतः अजित पवारांच्या भाजप प्रवेशाच्या वावड्यांना ब्रेक लागावा, यासाठी पवारांनी खेळी केल्याचंही बोललं जातंय.

त्यातच आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एक विधान केल्याचे खळबळ उडाली आहे. 'झी २४ तास'ला दिलेल्या मुलाखतीत जयंत पाटील यांना एक विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देतांना त्यांनी भाजपमध्ये जाणारे मर्यादित असतील, असं म्हटलं आहे.

jayant patil maharashtra politics
Ajit Pawar : पवारांनी निवृत्ती मागे घेतल्यानंतर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, त्यांचं वय अन् प्रकृती...

अनेकांना भाजपमध्ये जायचं आहे, असं पवारांनीच पुस्तकात लिहिलं आहे आणि आता त्यांनी निवृत्तीचा निर्णय घेतला याचा अर्थ तुम्हाला जे करायचंय ते करा; असं पवारांना सूचित करायचं आहे का? असा प्रश्न जयंत पाटलांना विचारण्यात आला.

जयंत पाटील उत्तर देतांना म्हणाले की, भाजपसोबत जाण्याचा विचार करणारे काही लोक पक्षात असू शकतात. परंतु त्यांची संख्या मर्यादित असेल. मात्र माझ्यासमोर अशा भूमिका कुणीही व्यक्त केलेल्या नाहीत.

jayant patil maharashtra politics
Sharad Pawar : निवृत्ती मागे घेतली पण पवारांच्या मनातला अध्यक्ष कोण? पत्रकार परिषदेत...

ते पुढे म्हणाले की, राष्ट्रवादीला आज राज्यात विस्तारण्याची संधी आहे. महाविकास आघाडीच्या प्रयोगाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. महाविकास आघाडी ब्रेक व्हावी, असं कुणाला वाटत असेल तर त्यांना रोखण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. असं विधान जयंत पाटील यांनी केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Jayant Patil BJP Entry sangli politics
Maharashtra politics latest Jayant Patil statement
Jayant Patil and Devendra Fadnavis kolhapur plane tour
Jayant Patil Jitendra Awhad Eknath Shinde meetting
Marathi News Esakal
www.esakal.com