Rashtrawadi Congress Party: 'या' तीन नेत्यांनी मिळून केली होती राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना; नंतर मात्र पवारांचंच एकहाती वर्चस्व

Sharad Pawar Resigns
Sharad Pawar Resigns esakal

Rashtrawadi Congress Party: शरद पवारांनी अचानकपणे आज निवृत्तीची घोषणा केली. या निर्णयामुळे कार्यकर्ते भावूक झालेले पहायला मिळत आहेत. पवारांनी निर्णय मागे घ्यावा, अशी विनंती कार्यकर्ते करीत आहेत. त्यामुळे शरद पवार निर्णयावर ठाम राहणार की काही वेगळा निर्णय घेणार, यासंदर्भात स्पष्टता येईल.

शरद पवार यांनी जाहीर केलेल्या निर्णयामुळे त्यांच्या संपूर्ण राजकीय कारकीर्दीवर चर्चा होत आहे. शरद पवारांचं काँग्रेसमधलं काम, त्यानंतर पुलोदचा प्रयोग आणि राष्ट्रवादी काँग्रेसची स्थपना; या सगळ्या चर्चा सुरु झाल्या आहेत. मुळात राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष देश पातळीवरच्या तीन नेत्यांनी सुरु केला होता. त्याबद्दल जाणून घेऊयात.

१० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली. त्यावेळी काँग्रेसमधून बाहेर पडलेले पूर्णो अगितोक संगमा, तारीख अन्वर आणि शरद पवार या तिघांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली होती. शरद पवारांनी स्वतःकडे अध्यक्षपद ठेवलं होतं. परंतु पुढे दोघेजण पक्षातून बाहेर पडले आणि एकट्या शरद पवारांनी पक्ष पुढे नेला.

तारीख अन्वर आणि पूर्णो संगमा राष्ट्रवादीतून बाहेर का पडले?

२०१२मध्ये राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत पी. ए. संगमा यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली. एनडीएकडून संगमांनी राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवली होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मात्र काँग्रेसच्या उमेदवाराला समर्थन दिलं.

राष्ट्रपती पदासाठी संगमा यांची उमेदवारी एआयएडीएमके आणि बीजेडीने प्रस्तावित केली होती आणि नंतर भाजपनेही पाठिंबा दिला होता. राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीला शरद पवारांच्या विरोधानंतर संगमा यांनी २० जून २०१२ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला.

२९ सप्टेंबर २०१८ रोजी तारीख अन्वर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. पक्षात किंमत मिळत नसल्याची त्यांनी नाराजी होतीच. परंतु राफेल करारावर पंतप्रधान मोदींना 'क्लीन चिट' दिल्याच्या शरद पवार यांच्या विधानानंतर त्यांनी राष्ट्रवादीतून बाहेर जाणं पसंत केलं.

Sharad Pawar Resigns
Sharad Pawar : "उद्धव ठाकरेंचं मंत्रालयात फक्त दोन वेळा जाणं, हे..." ; शरद पवारांचा थेट हल्ला

..तर कॉनराड संगमा राष्ट्रवादीचे मुख्यमंत्री असते

मेघालयचे विद्यमान मुख्यमंत्री कॉनराड संगमा हे पी. ए. संगमा यांचे सुपुत्र आहेत. पी. ए. संगमा यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडला नसता तर कॉनराड संगमा यांनी राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली असती.

पी. ए. संगमा यांनी राष्ट्रवादीतून बाहेर पडल्यानंतर नॅशनल पीपल्स पार्टीची स्थापना केली. २०२१ मध्ये त्यांच्या पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला आहे. आता नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा संपुष्टात आलेला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com