NCP अध्यक्षपदाच्या गोंधळात रोहित पवारांना धक्का; ४.५० लाखांचा दंड

रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ
Rohit Pawar
Rohit Pawaresakal

एकिकडे राष्ट्रवादी अध्यक्ष पदासंदर्भात गोंधळ सुरु आहे तर दुसरीकडे आमदार रोहित पवार यांना मोठा धक्का बसला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बारामती अॅग्रो साखर कारखान्याला ४.५० लाखांचा दंड बसला आहे. (Sharad Pawar Resigns Rohit pawar baramati agro sugar mill 4 lakh fine )

रोहित पवार यांच्या बारामती येथील ॲग्रो कारखान्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. साखर कारखान्यांबाबत सरकारने गाळप हंगाम सुरू करण्याबाबत तारीख निश्चित करण्यात आली होती. परंतु रोहित पवार यांच्या साखर कारखान्याने तारखे आधीच गाळप हंगाम सुरू केल्याने कारखान्यावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते. latest news

Rohit Pawar
Sharad Pawar Resigns: राष्ट्रवादी अध्यक्षपदासाठी पवारांच्या सख्ख्या बहिणीनं सुचवलं बड्या नेत्याचं नाव

मंत्री समितीच्या निर्णयाचे उल्लंघन करून गाळप केल्याने बारामती ॲग्रोचे व्यवस्थापकीय संचालक सुभाष गुळवे यांच्यावर कलम 188अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Rohit Pawar
Sharad Pawar: राष्ट्रवादीतील अनेक नेते कुंपणावर! शरद पवारांनी दूर केलं मळभ; ठाकरे गटानं मांडली भूमिका

इंदापूर तालुक्यातील शेटफळगढे येथील बारामती ॲग्रो साखर कारखान्याने 15 ऑक्टोबर 2022 पूर्वी गाळप हंगाम सुरू केल्याचा दावा भाजप नेते, विधान परिषदेचे आमदार राम शिंदे यांनी केला होता. यानंतर साखर आयुक्तालयांतर्गत विशेष लेखापरीक्षक यांच्यामार्फत या प्रकरणाच्या चौकशीचे निर्देश देण्यात आले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com