New NCP Chief: राष्ट्रवादी अध्यक्षपदासाठी पवारांच्या सख्ख्या बहिणीनं सुचवलं बड्या नेत्याचं नाव

New NCP Chief: राष्ट्रवादी अध्यक्षपदासाठी शरद पवार यांची बहिण सरोज पाटील यांनी सुचवलं बड्या नेत्याचं नाव
Sharad Pawar Resigns
Sharad Pawar Resigns

New NCP Chief: जयंत पाटील हे राष्ट्रवादी अध्यक्षपदासाठी योग्य आहेत, अशी मोठी प्रतिक्रिया ज्येष्ठ नेते शरद पवार यांची बहिण सरोज पाटील यांनी दिली आहे. (Sharad Pawar Resigns Saroj Patil on Jayant Patil NCP maharashtra politics)

राष्ट्रवादी काँग्रेसची राष्ट्रीय जबाबदारी सुप्रिया सुळे तर राज्यातली जबाबदारी अजित पवार यांच्याकडे जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहेत. अशातच सरोज पाटील यांच्या वक्तव्याने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

Sharad Pawar Resigns
Jayant Patil: सरोज पाटलांच्या इच्छेवर जयंत पाटलांचं भाष्य; म्हणाले, अध्यक्षपदासाठी माझं नाव...

काय म्हणाल्या सरोज पाटील?

राष्ट्रवादीचं अध्यक्षपद जयंत पाटील यांच्याकडे देण्यात यावं असं मत सरोज पाटील यांनी साम टीव्हीशी बोलताना व्यक्त केलं आहे. शरद पवार यांचे जे निवेदन मी ऐकलं ते मला योग्य वाटलं. कधी ना कधी ही खुर्ची सोडावी लागते.

पण अजित पवारांनी हे पद स्विकारलं तर...अजित पवार म्हणजे कामाचा राक्षस आहेत. त्यांच्यासारखं काम करणं कुणालाच जमणार नाही. पण अजित पवार यांनी हे पद स्विकारु नये.

Sharad Pawar Resigns
Sharad Pawar Resigns : 11 मे नंतर नवीन सरकार स्थापनेच्या घडामोडींना वेग; सोशल मिडियावर चर्चांना उधाण

तिसरा माझा आवडता नेता म्हणजे जयंत पाटील. अतिशय चारित्र्यसंपन्न असे ते आहेत आणि अभ्यासू आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीचे अध्यक्षपद जयंत पाटील यांना द्याव. अध्यक्षपदासाठी ते योग्य व्यक्ती आहेत. अस सरोज पाटील म्हणाल्या.

Sharad Pawar Resigns
Sharad Pawar Resigns: 'जयंत पाटील नैराश्यातून राष्ट्रवादी सोडून जातील'; भाजप नेत्याची NCPवर टीका

मात्र अध्यक्षपद स्विकारण्यास जयंत पाटील यांचा नकार

मी राष्ट्रीय अध्यक्ष होऊ शकत नाही. असं मोठं विधान जयंत पाटील यांनी केलं आहे. मी महाराष्ट्रात काम करतो. दिल्लीत माझी ओळख नाही. मी दिल्लीत काम करु शकत नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com