Vidhan Sabha 2019 : पवार म्हणतात, खडसेंचा जन्म माहिती आहे का कुठलाय?

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 3 October 2019

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी भारतीय जनता पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांचा जन्म कुठलाय माहितीय का? असा प्रश्न करत त्यांचा जन्म हा बारामतीत झाला असल्याचे सांगितले आहे. तसेच, खडसे हे जवळजवळ तीन महिन्यापासून आपल्या संपर्कात असल्याचेही शरद पवार यांनी म्हटले आहे.

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी भारतीय जनता पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांचा जन्म कुठलाय माहितीय का? असा प्रश्न करत त्यांचा जन्म हा बारामतीत झाला असल्याचे सांगितले आहे. तसेच, खडसे हे जवळजवळ तीन महिन्यापासून आपल्या संपर्कात असल्याचेही शरद पवार यांनी म्हटले आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाकडून खडसे यांना दुसऱ्या यादीतही तिकीट मिळाले नाही. यामुळे एकनाथ खडसे नाराज असल्याचे बोलले जात आहे. यावर, माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नावर शरद पवार बोलत होते. 

शरद पवार, यांनी खडसे यांच्याशी चर्चा चालू असल्याचे स्पष्ट केले आहे. परंतु, खडसेंनी शरद पवारांचे बोलण्यावर स्पष्टीकरण देताना शरद पवार यांच्याशी गेल्या तीन महिन्यापासूनच काय गेल्या तीन वर्षपासून आपण कुठल्याही राष्ट्रवादीच्या नेत्याच्या संपर्कात नसल्याचे सांगितले आहे.

दरम्यान, एकनाथ खडसे यांच्या उमेदवारीवर बोलताना भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी खडसे सांगतील त्या उमेदवाराला उमेदवारी देणार आहोत, परंतु, खडसेंना उमेदवारी देणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sharad pawar speak about Eknath Khadse Birth place