
राज्यपालांनी आम्हाला भरपूर वेळ दिला आहे. त्यामुळे आम्ही नक्की निर्णय घेऊ असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी म्हटले आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील झालेल्या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत पवार बोलत होते.
मुंबई : राज्यपालांनी आम्हाला भरपूर वेळ दिला आहे. त्यामुळे आम्ही नक्की निर्णय घेऊ असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी म्हटले आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील झालेल्या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत पवार बोलत होते.
'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा
पत्रकार परिषदेला शरद पवार यांच्यासोबत काँग्रेसचे नेते अहमद पटेल, वेणूगोपाल, मल्लिकार्जुन खर्गे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात तसेच राष्ट्रवादीचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल उपस्थित होते.
काँग्रेसला आमंत्रण न देणं हे चुकीचं - अहमद पटेल
पवार म्हणाले, 'सरकार कसं बनवायचं हे स्पष्ट झाल्याशिवाय निर्णय घेणार नाही. सेनेने अधिकृतपणे कालच संपर्क केला आहे. शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत आघाडीचा आणखी निर्णय झाला नाही. एकत्र निवडणूक लढलो असल्याने काँग्रेससोबत चर्चा झाल्याशिवाय कुठलाही निर्णय झाला नसल्याचेही पवार यांनी सांगितले आहे. जो काही निर्णय होईल तो दोन्ही पक्ष मिळून घेतील असेही शरद पवार यांनी सांगितले आहे.