
Latest Maharasthra NEws: विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसला ८० लाख मते मिळून त्यांचे १५ आमदार निवडून आले, तर शिवसेनेला (शिंदे गट) ७९ लाख मते मिळून त्यांचे ५७ आमदार निवडून आले. कॉंग्रेसपेक्षा त्यांना मते एक लाखाने कमी पडली. राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार गट) ला ५८ लाख मते पडून ४१ जण निवडून आले. त्यापेक्षा जादा मते मिळूनही राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार गट) च्या कमी जागा आल्या. मतांची आकडेवारी आश्चर्यकारक आहे.
जर मते जादा मिळाली तर मग महाविकास आघाडीचा पराभव झालाच कसा?,’ असा सवाल राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार गट)चे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आज येथे पत्रकार परिषदेत उपस्थित केला.