esakal | राजू शेट्टींचं नाव आम्ही राज्यपालांच्या यादीतून वगळलं नाही - शरद पवार
sakal

बोलून बातमी शोधा

Sharad Pawar

राजू शेट्टींचं नाव आम्ही राज्यपालांच्या यादीतून वगळलं नाही - शरद पवार

sakal_logo
By
सुधीर काकडे

मागच्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या यादीबद्दल आज शरद पवार (Sharad Pawar) यांनी महत्वाचे वक्तव्य केले आहे. १२ आमदारांची यादी आम्ही राज्यपालांकडे पाठवली असून राज्यपाल त्याबद्दलचा अंतिम निर्णय घेतील असे शरद पवार यांनी यावेळी केले आहे. या यादीतून राजू शेट्टी यांचे नाव वगळण्यात आल्याच्या पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना याबद्दल राज्यपाल निर्णय घेतील अशी माहिती शरद पवार यांनी दिली आहे.

राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या यादीबद्दल मागच्या दोन दिवसांपासुन राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे. त्यातच यादीतून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजु शेट्टी यांचे नाव वगळल्याच्या प्रश्नांना उत्तर देताना शरद पवार यांनी सांगितले की, राज्यपालांकडे दिलेल्या यादीतून आम्ही राजू शेट्टी यांचे नाव वगळले नाही. ते नाराज असतील याची मला माहिती नाही. आम्ही जे नाव राज्यपाल यांना दिली आहे. त्यामध्ये राजू शेट्टी यांनी शेती व सहकार क्षेत्रात काम केलं आहे, म्हणुन त्यांना घ्यावं अस सागितले आहे. अजून त्यावर निर्णय झाला नाही. मी दिलेला शद्ब पाळला आहे. राजू शेट्टी यांनी काय करावं हा त्यांचा निर्णय आहे, असेही शरद पवार यांनी यावेळी सांगितले.

राज्यातील मंदिरांबद्दल पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना शरद पवार म्हणाले की, मंदिर उघडावी की नाही हा केंद्र सरकार व राज्यसरकार यांनी ठरविले आहे. केंद्रसरकारची लोकं राज्यात आहेत, त्यांनी विचार करावा. त्यांच्या नियमांनुसार राज्यात मंदिरे उघडली जातील. मात्र केंद्राने आणि राज्याने कोरोनाबाबत जे नियम केलेले आहेत, त्याप्रमाणे सध्या चालू काम सुरु आहे असे माजी कृषीमंत्री शरद पवार यांनी कर्वेनगर येथे केले.

हेही वाचा: मी पण करेक्ट कार्यक्रम करणार, राजू शेट्टींचा राष्ट्रवादीला इशारा

दरम्यान याबद्दल बोलताना, विधानपरिषदेची एक जागा स्वाभिमानीला देणं ही दया माया नाही, तसा समझौता दोन्ही पक्षामध्ये झाला होता असे मत राजु शेट्टी यांनी व्यक्त केले होते. पुढे बोलताना राजू शेट्टी असेही म्हणाले की, दिलेला पाळायचा की, पुन्हा पाठीत खंजीर खुपसायचा हे राष्ट्रवादीने ठरवावे. करेक्ट कार्यक्रमाच्या पलीकडे आणखी एक करेक्ट कार्यक्रम असतो. तो कार्यक्रम मी करेन, असा थेट इशारा राजू शेट्टी यांनी राष्ट्रवादीला दिला होता.

loading image
go to top