शरद पवारांनी आजच्याच दिवशी पहिल्यांदा घेतली होती मुख्यमंत्रिपदाची शपथ

गेल्या पन्नास वर्षांहून अधिक काळ ते सक्रीय राजकारणात कार्यरत आहेत.
Sharad Pawars
Sharad Pawars

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांचं नाव कोणाला माहिती नाही, असा एकही व्यक्ती आपल्याला भेटणार नाही. राजकीय जीवनात ५० वर्षांहून अधिक काळापासून शरद पवार सक्रीय आहेत. पण याच राजकारणातील सर्वात तरुण मुख्यमंत्री होणाचं भाग्यही त्यांना लाभलं. आजचाच दिवस म्हणजे १८ जुलै १९७८ रोजी पहिल्यांदा शरद पवार यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. (Sharad Pawar took oath as Chief Minister for first time on this day 18 July 1978)

Sharad Pawars
इंग्लंडचा स्टार खेळाडू बेन स्टोक्सची वनडे क्रिकेटमधून निवृत्ती

महाराष्ट्रासारख्या प्रगत व पुरोगामी राज्याचे सर्वात तरूण मुख्यमंत्री बनण्याचा मान पवार साहेबांना मिळाला. गेली ५० हून अधिक वर्षे पवार साहेब संसदीय राजकारणात सक्रीय आहेत. सन 1978 ते 1980, सन 1988 ते 1991 आणि सन 1993 ते 1995 या कालखंडांत महाराष्ट्राचं मुख्यमंत्री भूषवलं आहे. केंद्रातही त्यांनी अनेक महत्वाच्या जबाबदाऱ्या संभाळल्या आहेत. शरद पवार आज ८२ वर्षांचे आहेत. मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात शरद पवारांनी केलेलं काम महाराष्ट्राच्या कायम लक्षात राहिलेलं आहे. महाराष्ट्राचे चार वेळा मुख्यमंत्री, देशाचे संरक्षणमंत्री, लोकसभेचे विरोधी पक्षनेते, कृषिमंत्री अशी महत्त्वाची पदे भूषविणाऱ्या शरद पवारांना राजकारणातील चालतं-बोलतं विद्यापीठ बोललं जातं.

पहिली विधानसभा निवडणूक

सर्वप्रथम 1967 साली विधानसभा निवडणुकीत ते बारामती मतदारसंघातून विजयी झाले. वसंतराव नाईक यांच्या मंत्रिमंडळात वयाच्या 29 व्या वर्षी त्यांना राज्यमंत्रीपद मिळालं. 1972 आणि 1978 च्या निवडणुकीतही त्यांचा विजय झाला. 1978 साली वसंतदादा पाटील मुखमंत्री झाले. त्यावेळी काँग्रेस पक्षाचे 12 आमदार फोडून पवारांनी विरोधी पक्षाबरोबर हातमिळवणी केली होती आणि मुख्यमंत्री बनले होते. त्यामुळे वसंतदादांचे सरकार पडले होते.

लोकसभा निवडणूक लढवली

सन 1984 साली शरद पवारांनी लोकसभा निवडणूक लढवली आणि ते विजयी झाले. पण, त्यांनी राष्ट्रीय राजकारणात न जाता, राज्यातच राहण्याचा निर्णय घेतला. 1985 साली विधानसभा निवडणूक त्यांनी बारामतीतून जिंकली. त्यानंतर त्यांनी लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला.

राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना अन् महाविकास आघाडी

10 जून 1999 रोजी शरद पवारांनी 'राष्ट्रवादी काँग्रेसची' स्थापना केली. 1999 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकींनंतर कोणत्याही पक्ष अथवा आघाडीस बहुमत मिळाले नाही. त्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी होऊन विलासराव देशमुख राज्याचे नवे मुख्यमंत्री झाले. 2004 मध्ये राष्ट्रवादी केंद्रात मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकारमध्ये सामील झाला. 2004 मध्ये शरद पवारांनी देशाचे कृषिमंत्री म्हणून सूत्रे हाती घेतली. 2009 साली केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांना कृषी, ग्राहकांशी संबंधित बाबी, अन्न आणि सार्वजनिक वितरण ह्या खात्यांची धुरा देण्यात आली. 2014 मध्ये पवारांनी लोकसभा न लढण्याचा निर्णय घेतला होता. ते सध्या राज्यसभेवर खासदार आहेत. 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणूकीत राष्ट्रवादी पक्षाला 52 जागा मिळाल्या. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षांचे मिळून महाआघाडीचे सरकार महाराष्ट्रामध्ये निर्माण करण्यात शरद पवार यांचा मोलाचा वाटा होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com