Sharad Pawar News: पवार आणि दानवेंचा एकाच वाहनातून प्रवास; काय आहे कारण? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sharad Pawar News

Sharad Pawar News: पवार आणि दानवेंचा एकाच वाहनातून प्रवास; काय आहे कारण?

औरंगाबादः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दावने यांनी आज एकाच वाहनातून प्रवास केलेला आहे. त्यामुळे राजकीय चर्चा रंगू लागल्यात.

शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह गोठवल्यामुळे महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण तापलेलं आहे. आता शिवसेना अंधेरी पोटनिवडणूक कुठल्या चिन्हावर लढणार, याबद्दल तर्क-वितर्क लावले जातायत. यातच शरद पवार यांनी शिवसेनेसोबत असल्याचं स्पष्ट केलेलं असतांना त्यांच्या या एकत्र प्रवासाने आश्चर्य व्यक्त होतय.

बीड येथे माजी मंत्री शिवाजीराव पंडित यांच्या ८५व्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्यासाठी शरद पवार हे औरंगाबाद येथे दाखल झाले. औरंगाबाद येथील ज्या हॉटेलमध्ये शरद पवार थांबले होते तेथे भाजपचे नेते तथा केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पोहोचले. दोघांनीही सकाळी १० वाजण्याच्या दरम्यान औरंगाबाद ते बीड असा एकत्र प्रवास केला.

हेही वाचा: Sharad Pawar : "ज्याची भिती होती..."; सेनेचे चिन्ह गोठवल्यानंतर पवारांची प्रतिक्रिया

बीडच्या पंडित कुटुंबाशी शरद पवारांना जुना स्नेह आहे. माजी मंत्री शिवाजीराव पंडित यांचे चिरंजीव माजी आ. अमरसिंह पंडित हे पवारांच्या अत्यंत विश्वासू सहकाऱ्यांपैकी एक आहेत. त्यामुळे पवार आज बीडमध्ये अभिष्टचिंतन सोहळ्यासाठी दाखल होत आहेत.