बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण राज्यात चर्चेत आहे. आरोपींना फाशी शिक्षा होण्यासाठी राज्यभरात मोर्चे निघत आहेत. या प्रकरणातील एक आरोपी अद्याप फरार आहे. पोलिसांनी ठोस कारवाई न केल्यामुळे राज्यभरात संताप व्यक्त होत आहे. तर खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड याचा या प्रकरणाशी संबंध असल्याचा आरोप देखील विरोधकांकडून होत आहे.
अशातच आता शरद पवार यांनी या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. गुंडांपासून लोकप्रतिनिधींच्या जीवाला धोका निर्माण झाला असून राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी गांभीर्याने लक्ष घालावे, असे त्यांनी म्हटले आहे.