

Sharad Pawar letter to CM Fadnavis
Esakal
राज्यात अनेक भागांत पावसाने ओढ दिल्याने शेतकऱ्यांसमोर संकट निर्माण झालंय. पिकांचे नुकसान, पाणीटंचाई आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. राज्य सरकारने २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर केला आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलंय. दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी सरकारने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी त्यांनी केली आहे. विधिमंडळाचे 3 दिवसांचे विशेष अधिवेशन बोलावून दसरा-दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मदत द्यावी असंही पत्रात म्हटलं आहे.