esakal | राम मंदिर निकालावर शरद पवारांचं 'मोठं' वक्तव्य..
sakal

बोलून बातमी शोधा

राम मंदिर निकालावर शरद पवारांचं 'मोठं' वक्तव्य..

राम मंदिर निकालानंतर शांतता आणि संयम पाळा..! शरद पवारांचे नव्या आमदारांना आवाहन.. 

राम मंदिर निकालावर शरद पवारांचं 'मोठं' वक्तव्य..

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : सर्वोच्च न्यायालयात 9 नोव्हेंबरला राम मंदिराचा अंतिम निकाल लागण्याचे संकेत आहेत. या निकालानंतर देशात काहीजण सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रसत्न करतील. अशा वेळी राष्ट्रवादीच्या सर्व नवनियुक्त आमदारांनी आपापल्या मतदार संघात शांतता व संयम राहिल यासाठी प्रयत्न करावेत. कोणत्याही असामाजिक तत्वांना या निकालाचा फायदा घेवून समाजात अशांतता निर्माण करता येणार नाही याची काळजी घ्यावी. असे आवाहन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज आमदारांच्या बैठकीत केले. 

संजय राऊत म्हणतात, 'महाराष्ट्राची कुंडली आम्हीच ठरविणार'

राष्ट्रवादी भवन मधे आज पवार यांच्या हस्ते विजयी आमदारांचे स्वागत करण्यात आले. व विधीमंडळ पक्षनेते पदाची निवड करण्यात आली. त्यानंतर ते बोलत होते. 

"जो काही निकाल देईल तो सर्वांनी मान्य करायला हवा"

देशात सध्या राम मंदिर निकालाची उत्सुकता आहे. सर्वोच्च न्यायालय जो काही निकाल देईल तो सर्वांनी मान्य करायला हवा. त्यामुळे न्यायालयाच्या निकालाचा आदर सर्वणांनीच करायला हवा. असे पवार म्हणाले. 

अजित पवार यांची राष्ट्रवादीच्या विधिमंडळ नेतेपदी निवड; आता प्रतीक्षा विरोधीपक्ष नेत्याची

राज्यातील प्रश्नावर आक्रमक होवून सरकारला जाब विचारा

दरम्यान, राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांनी विधानसभेत विरोधी पक्ष म्हणून प्रभावी काम करताना या राज्यातील जनतेच्या मुळ समस्या व त्यावरील उपाययोजना यावरच भर द्यावा. राज्यातील आर्थिक मंदी, शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी या प्रश्नावर आक्रमक होवून सरकारला जाब विचारावा. अशी सूचना शरद पवार यांनी केली. 

पाच वर्षे महायुतीचं स्थिर सरकार येणार; भाजपच्या गटनेतेपदी फडणवीसांची निवड

आजच्या या पहिल्याच बैठकीत अजित पवार यांची विधीमंडळ पक्षाचे नेते म्हणून बिनविरोध व एकमताने निवड करण्यात आली. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी याबाबतचा प्रस्ताव मांडला. त्याला धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड, हसन मुश्रीफ यांनी अनुमोदन दिले. विधानसभा विरोधी पक्षनेत्याची मात्र आज निवड करण्यात आली नाही. 
 

Webtile : sharad pawars statement on supreme courts verdict on ram mandir and aayodhya

loading image