भाजपमध्ये धूसफूस सुरु; मागील महिन्याच्या राजकारणाचा पहिला बळी

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 26 May 2020

मुंबई : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि भारतीय जनता पक्ष आखत असलेली रणनिती यावर नाराज होऊन शरद झांबरे पाटील यांनी प्रदेश भाजप सोशल मिडिया कार्यकारणी सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे. यावरून भाजपमध्ये धुसफूस सुरु असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यांनी त्यांचा राजीनामा पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे सोशल मिडीया संयोजक प्रविण अलई यांच्याकडे पाठवला आहे

मुंबई : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि भारतीय जनता पक्ष आखत असलेली रणनिती यावर नाराज होऊन शरद झांबरे पाटील यांनी प्रदेश भाजप सोशल मिडिया कार्यकारणी सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे. यावरून भाजपमध्ये धुसफूस सुरु असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यांनी त्यांचा राजीनामा पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे सोशल मिडीया संयोजक प्रविण अलई यांच्याकडे पाठवला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

मागील महिनाभरापासून चालू असलेल्या राजकारणाचा हा पहिला बळी आहे. शरद झांबरे यांनी पत्र लिहून आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राजीनामा दिलेल्या पत्रात त्यांनी राजीनामा देण्याचे कारण स्पष्ट लिहले आहे. शरद झांबरे यांनी म्हटले आहे की, काही महिन्यांपासून पक्षांमध्ये घडत असलेल्या कृतीशी आणि विचारांशी मी सहमत नाही, त्याकारणाने मी हा राजीनामा देत आहे. 

दरम्यान, या राजीनाम्याच्या एक प्रत त्यांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना आणि एक प्रत पक्षाचे नेते माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना दिली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sharad Zambare resigns as state BJP social media executive member