ठाकरे बंधू एकत्र येणार? शर्मिला ठाकरेंचं सूचक विधान

Sharmila Thackeray
Sharmila ThackeraySakal
Updated on

मुंबई : राज्यात सत्तांतर झाल्यावर शिवसेनेचं मोठं नुकसान झालं. त्यानंतर शिवसेना आणि मनसे म्हणजेच शिवसेनेचे उद्धव ठाकरे आणि मनसेचे राज ठाकरे यांनी एकत्र यावं असा काहीसा सूर काही कार्यकर्त्यांकडून येत होता. त्यानंतर आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येणार का? हा प्रश्न विचारल्यावर राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

(Sharmila Thackeray On MNS And Shivsena Alliance)

ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या प्रश्नावर राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी दिलेल्या उत्तरावर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत. शर्मिला ठाकरे या प्रश्नावर उत्तर देताना म्हणाल्या की, "साद घातली तर येऊदेत." त्यानंतर आता त्यांच्या या वक्तव्याची चर्चा सुरू झाली असून ठाकरे बंधू एकत्र येणार का? या चर्चांना उधाण आलं आहे. शिवसेनेने पुढाकार घेतला तर ही युती होऊ शकते असाही विश्वास व्यक्त केला जात आहे.

Sharmila Thackeray
मुंबईला बॉम्बने उडवण्याची धमकी; उपमुख्यमंत्री म्हणाले...

शर्मिला ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधताना हे वक्तव्य केलं असून राज्यात सत्तांतर झाल्यावर शिवसेनेचं मोठं नुकसान झालं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्यासोबत ४० आमदार घेऊन शिवसेनेला बंड करत राज्यात भाजपसोबत सत्ता स्थापन केली आहे. त्यानंतर आता शिवसेना आपली संघटना वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहे. यावेळी दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यायला पाहिजे असं मत अनेकांकडून व्यक्त करण्यात येत होतं. या चर्चेविषयी विचारले असता राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी, "त्यांनी साद घातली तर येऊदेत" असं वक्तव्य केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Drugs
sangola, shelakewadi zp school
Deccan Police have registered a case after an unemployed youth was allegedly cheated of Rs 20 lakh on the promise of a government job in Pune.
Speaking at Sakal Bhakti Shakti Vyaspeeth, Dr More highlighted the contribution of saints in shaping Maharashtra's social and cultural legacy.
Marathi News Esakal
www.esakal.com