
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती झालेले शशिकांत शिंदे यांनी आगामी काळात पक्षाचे संघटन मजबूत करून अधिक आक्रमक पक्ष बांधणी करण्याचा मानस व्यक्त केला आहे. मूळचे माथाडी कामगार आणि माथाडी नेते असलेल्या शिंदे यांना त्यांच्या कामगार चळवळीतील अनुभवाचा फायदा होणार असल्याचा विश्वास त्यांनी ‘सकाळ’ला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केला.