वसई: बायकोला काय उत्तर द्यायचं? स्वत:च रचलेल्या कटात फसला व्यापारी | Vasai | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वसई: बायकोला काय उत्तर द्यायचं? स्वत:च रचलेल्या कटात फसला व्यापारी

वसई: बायकोला काय उत्तर द्यायचं? स्वत:च रचलेल्या कटात फसला व्यापारी

नालासोपारा:  कमी वेळेत जास्त पैसे कामविण्याची लालसा काही क्षणात कशी उद्धवस्त करते, याचं एक उदाहरण वसईत (Vasai) समोर आलं आहे. मुलीच्या लग्नासाठी जमा केलेले 10 लाख रुपये बिटकॉईनमध्ये (Bitcoin) गुंतवले, त्यात तोटा झाल्याने, बायकोला आता काय उत्तर द्यायचे, यासाठी विरारच्या एका व्यापाराने (Trader) चक्क दहा लाखाच्या लुटीचाच बनाव रचल्याचा कट वसईत उघडकीस आला आहे. मात्र त्याचा हा बनाव वसईच्या पोलिसांनी अवघ्या काही तासात उघडं करत, त्याचा पूर्णपणे भांडाफोड केला आहे. पोलिसांनी त्या व्यापा-याचा हा बनाव स्टेशन डायरीमध्ये नोंद करुन, त्याला समज देवून सोडून देण्यात आलं आहे.

वसईच्या पापडी येथील साई सर्व्हिस सेंटर समोर 10 लाखाची रोखड घेवून, अज्ञात चोरटा फरार झाला असल्याची तक्रार विरारच्या सुभंत यशवंत लिंगायत या व्यापा-याने काल 1 च्या सुमारास वसई पोलिस ठाण्यात केली होती. जबरी चोरीची घटना असल्याने, वरिष्ठ पोलीस अधिकारी वसई पोलिसांनी घटनास्थळाचा संपूर्ण पंचनामा करून, तपास केला असता ही जबरी चोरी नसून, व्यापाऱ्याचा हा बनाव असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.

हेही वाचा: 'मोठं कारस्थान', शशिकांत शिंदेंची पराभवानंतर प्रतिक्रिया

८ डिसेंबर रोजी सुभंत लिंगायत यांच्या मुलीच लग्न आहे. आणि त्यासाठी त्याने दहा लाख रुपये जमा केले होते. मात्र अधिक पैशासाठी त्याने हे दहा लाख बिटकॉईन मध्ये गुतंवले. बिटकॉईन मध्ये मोठ्या प्रमाणात तोटा झाल्याने, घरी बायकोला काय सांगायचं याच विचाराने त्याने आपली दहा लाखाची रोखड चोरटयाने चोरुन नेल्याचा बनाव रचल्याची पोलीस तपासात कबुली दिली. सर्व प्रकाराचा उलगडा झाला असल्याचे वसई चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याणराव कर्पे यांनी सांगितले आहे.

हेही वाचा: 'पाठीमागून वार करणारी लोकं' म्हणत 'जय भीम'च्या लेखकाने परत केलं मानधन

काय होता बनाव

सुभंत यशवंत लिंगायत हा विरार मधील होलसेल व्यापारी आहे. सुभंत याने बनाव आखला की, 22 नोव्हेंबर रोजी दुपारी 1 च्या सुमारास वसईच्या  साई सर्व्हिस येथे रिक्षा थांबवून, रस्ता क्रॉस करणार तेवढ्यात एका अज्ञात बाईकस्वाराने हातातील दहा लाखाची रोकड घेवून, फरार झाला. दहा लाखाच्या रक्कमेतील सव्वा लाख मारुती सुझुकीची गाडी घेण्यासाठी आगावू रक्कम देण्यासाठी गेलेलो. त्यानंतर बोरीवली येथे काही व्यापा-याना रक्कम द्याची होती असा बनाव त्याने आखला होता. मात्र पोलिसांना घटनास्थळावर कोणतीही हरकत, किंवा अशी घटना घडल्यासंदर्भातचे पुरावे आढळले नाही. त्यामुळे पोलिसांनी अधिक तपास केल्यावर व्यापा-याने आपण बनाव आखल्याचा मान्य केलं.

loading image
go to top