Irshalwadi Landslide: ती हळूहळू बोलतेय, सावरतेय...! इर्शाळवाडी दरड दुर्घटनेचा १६ वर्षांच्या मुलीच्या मनावर तीव्र आघात

इर्शाळवाडीवर कोसळलेल्या दरडीत १६ वर्षांच्या मुलीने कुटुंबातील सर्व सदस्य गमावले
Irshalwadi Landslide
Irshalwadi LandslideEsakal

इर्शाळवाडीवर कोसळलेल्या दरडीत १६ वर्षांच्या मुलीने कुटुंबातील सर्व सदस्य गमावले. एका झटक्यात या मुलीचे जीवन बदलून गेले. राहते घर गेले, आता निवारागृहामध्ये राहत असलेली ही मुलगी मानसिकदृष्ट्या खचली आहे. गेल्या आठवडाभर या मुलीची वाचा बसली होती. ती कुणाशीच बोलत नव्हती. डॉक्टरांनी समुपदेशन केल्यानंतर ती हळूहळू बोलू लागली आहे. इर्शाळवाडी दुर्घटनेतील उपचार घेत असलेल्या आणि तात्पुरत्या निवाऱ्यात पाठवलेल्या अनेकांची हीच अवस्था आहे.

हसती-खेळती इर्शाळवाडी १९ जुलैच्या काळरात्री संपूर्ण जमिनीत गाडली गेली. उद्या (ता. २६) या घटनेला आठवडा पूर्ण होईल. या दुर्घटनेत २५हून अधिक कुटुंबांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले; मात्र आप्तस्वकीयांसोबत आपले हक्काचे घर गमावलेल्यांच्या नागरिकांच्या मनावर मोठा आघात झाला आहे. या मानसिक धक्क्याने अनेक दुर्घटनाग्रस्त बोलतच नाहीत.

या धक्क्यातून सावरण्यासाठी आता आरोग्य यंत्रणेने समुपदेशन करण्यास सुरुवात केली आहे. ही प्रक्रिया महिनाभरापर्यंत सुरू राहणार असल्याची माहिती देण्यात आली.

Irshalwadi Landslide
Uddhav Thackrey: 'शिवसेनेने खंजीर खुपसला म्हणून शिवसेना फोडली, मग राष्ट्रवादीनं काय खुपसलं? ती का फोडली?', ठाकरेंचा सवाल

दुर्घटनेत एका तरुणाच्या मांडीला जबरदस्त मार लागल्याने त्याच्या किडनीवर परिणाम झाला आहे. या तरुणाचे डायलिसिस करणे गरजेचे होते; मात्र मानसिक आधार गमावलेला हा तरुण ‘मला मरायचे आहे’, असे सागून डायलिसिस घ्यायला नकार देत होता. त्याचे समुपदेशन केल्यानंतर तो तयार झाला. आता त्याचे दोनदा डायलिसिस करण्यात आल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

इर्शाळवाडी दुर्घटनेतून सावरण्यासाठी आरोग्य यंत्रणेकडून आवश्यक त्या उपाययोजना केल्या जाणार आहेत. यामध्ये समुपदेशन हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे.

- डॉ. तानाजी सावंत, सार्वजनिक आरोग्य मंत्री

Irshalwadi Landslide
Monsoon Session: ‘राष्ट्रवादी’चे आमदार अधिवेशनात हजेरीसाठीच उपस्थित; द्विधा मनःस्थितीमुळे बहुतांश सदस्यांची कामकाजाकडे पाठ?

सात जणांचे पथक वेगवेगळ्या दिवशी दुर्घटनाग्रस्त व्यक्तींचे समुपदेशन करणार आहे. सध्या आम्ही महिनाभराचे नियोजन केले आहे; मात्र त्यापुढेही समुपदेशकांची गरज भासणार आहे. कदाचित ते स्वतःच्या घरात जाईपर्यंत त्यांना समुपदेशनाची गरज लागेल.

- डॉ. अंबादास देवमाने,

जिल्हा शल्यचिकित्सक, रायगड

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com