जयंत पाटलांचाच झाला करेक्ट कार्यक्रम; शिंदे-फडणवीसांनी दिले चौकशी आदेश

राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस
Jayant Patil
Jayant Patil esakal

राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस होता. आजही सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण पहायला मिळालं. मात्र या आधिवेशनात शिंदे-फडणवीसांनी राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांना धक्का दिला आहे.

Jayant Patil
Political News: नेटकरी म्हणतात, फडणवीसांच्या शाळेत पवार हेडमास्तर; एका दगडात ४ पक्षी जाळ्यात

एकीकडे विधानसभा अध्यक्षांना अपशब्द वापरल्या प्रकरणी जयंत पाटील यांना निलंबीत करण्यात आले होते. तर आज मात्र सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील गैरव्यवहाराची चौकशी करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत.

त्यामुळे जयंत पाटील चांगलेच अडचणीत येण्याची शक्यता आहे. सांगली जिल्हा बँकेवर अनेक वर्षांपासून जयंत पाटीलांची सत्ता आहे. त्यामुळे त्यांच्यांवर गैरव्यवहाराचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान मागील कार्यकाळात मविआ आघाडी सरकार होतं त्यावेळी मानसिंग नाईक यांना बँकेचं अध्यक्षपद न मिळाल्यामुळे त्यांनी चौकशीची मागणी केली होती.

Jayant Patil
Devendra Fadnavis : 'मविआ' सरकार फडणवीसांना तुरुंगात टाकणार होतं ; सभागृहात गौप्यस्फोट

हेही वाचा-जोखमीचे भान राखूनच करा SIP मध्ये गुंतवणूक

मात्र तत्कालीन सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी चौकशीला स्थगिती दिली होती. चालू वर्षी पार पडलेल्या निवडणुकीत पुन्हा जयंत पाटील यांची सत्ता बँकेवर आली. आणि यावेळी मानसिंग नाईक यांना बॅंकेचं अध्यक्षपद देण्यात आलं.

मात्र मागील वर्षी केलेली मागणी या आधिवेशनात आमदार गोपीचंद पडळकर यांनी लावून धरत चौकशीची मागणी केली. त्यामुळे त्यावेळची मागणी अंगलट आली आहे. दरम्यान सहकार मंत्री अतुल सावे यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे जयंत पाटलांना दुसरा धक्का मानला जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com