Sada Saravankar| सदा सरवणकरांचे पिस्तूल जप्त ;प्रभादेवी राडा प्रकरणी पोलीसांची कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sada Saravankar

Sada Saravankar: सदा सरवणकरांचे पिस्तूल जप्त ;प्रभादेवी राडा प्रकरणी पोलीसांची कारवाई

मुंबईत प्रभादेवी येथील शिवसेना आणि शिंदे गटात झालेल्या राड्यामुळे राजकारण चांगलेच तापले आहे. यामध्ये पोलीस ठाण्याच्या आवारात झालेल्या गोळीबारप्रकरणी आमदार सदा सरवणकर यांची पिस्तूल जप्त करण्यात आली आहे. तसेच, पोलीसांकडून त्यांना समन्सदेखील बजावण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

गणपती विसर्जनादरम्यान एकमेकांना डिवचल्याच्या रागातून शनिवारी रात्री प्रभादेवीत शिवसेना आणि शिंदे गटात हाणामारी झाली. दादर पोलिसी दोन्ही गटांविरोधात गुन्हा नोंदवत अधिक तपास करीत आहेत. यामध्ये पोलीस ठाण्याबाहेर जमलेल्या गर्दी दरम्यान, सरवणकर यांनी एक गोळी जमिनीच्या दिशेने झाडल्यामुळे खळबळ उडाली.

याच मुद्द्यावरून त्यांच्यावर कारवाईची मागणी वाढली. याप्रकरणी पोलिसांनी सरवणकर यांच्यासह इतर लोकांविरोधात आर्म्स ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला. याच प्रकरणाच्या तपासासाठी पोलीस सरवणकर यांची पिस्तूल पोलीसांनी ताब्यात घेतली आहे.

पोलिस ठाण्याच्या आवारात असलेले सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागल्यामुळे गोळीबार झाल्याची जवळजवळ खात्री पटली आहे, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे. या सबळ पुराव्यावरून दादर पोलिसांनी शिंदे गटातील आमदार सदा सरवणकरसह इतर १० ते १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, त्यात आर्म्स कायदा (शस्त्र अधिनियम कायदा) कलम लावण्यात आले आहे.

दादर पोलिसांनी शनिवारी रात्री ठाकरे गटावर गुन्हा दाखल करून विभाग प्रमुख महेश सावंत यांच्यासह ५ जणांना अटक करून त्यांच्या विरुद्ध दंगलीसह जबरी चोरीचे कलम लावण्यात आले होते. मात्र तपासात जबरी चोरी झाली नसल्याचे समोर आले असून ३९५ हे कलम काढण्यात आले आहे. त्यांची वैयक्तिक जामिनावर पोलिस ठाण्यातून सुटका करण्यात येणार असल्याचे समजते.

Web Title: Shinde Group Mla Sada Saravankar Pistol Seized Will There Be Controversy In Prabhadevi

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..