
शिर्डी साईबाबा संस्थानने साई भक्तांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आता दर्शन रांगेत उभ्या असलेल्या भक्तांना मोफत प्रसाद भोजनाचे कूपन मिळणार आहे. तसेच, संस्थानच्या भक्त निवासात राहणाऱ्या भक्तांनाही हे कूपन वितरित केले जाणार आहे. शिर्डीतील दुहेरी हत्याकांडानंतर साई संस्थानचा हा दुसरा मोठा निर्णय घेतला आहे.