
Grand Shiv Jayanti Celebration in Maharashtra: देशभरात ३९५ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेल्या शिवनेरी किल्ल्यावर आज, बुधवारी (१९ फेब्रुवारी) विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. सकाळी पारंपरिक शिवजन्म सोहळा पार पडला. छत्रपती शिवाजी महाराजांना पोलिस दलाकडून मानवंदना देण्यात आली.