
देशभरात शिवजयंतीचा उस्साह आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यात 395 शिवजयंतीची मोठी तयारी करण्यात आली असून शिवनेरी किल्ला शिवजयंतीच्या उत्सवासाठी सजला आहे. काल रात्रीपासूनच लाखो शिवप्रेमी शिवनेरीवर दाखल झाले आहेत. शिवजयंतीनिमित्त शिवनेरी किल्ल्यावर आज, बुधवारी (१९ फेब्रुवारी) विविध कार्यक्रम होणार असून, पारंपरिक शिवजन्म सोहळा आणि छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना दिली जाणार आहे. दरम्यान पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी आज पहाटे किल्ल्यावर शिवाई देवीची आरती केली.