Maratha Reservation : उद्याच्या अधिवेशनात काय होणार?, मुख्यमंत्र्यांनी शिवनेरीवरुन केली घोषणा

महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त किल्ले शिवनेरीवर विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची या कार्यक्रमाला उपस्थिती होती.
Maratha Reservation
Maratha Reservationesakal

पुणेः महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त किल्ले शिवनेरीवर विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची या कार्यक्रमाला उपस्थिती होती.

शिवजयंती सोहळ्यात दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मनोगत व्यक्त करुन हे राज्य छत्रपती शिवरायांच्या विचारांवर चालणारं राज्य आहे, असं सांगत राज्य सरकार राबवत असलेल्या उपक्रमांबद्दल माहिती दिली. शिवाय मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दलही भाष्य केलं.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलताना म्हणाले की, शिवछत्रपतींचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून जे काही करता येईल, ते आम्ही करण्याचा प्रयत्न करत आहोत. मागे आम्ही काश्मीरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला. पाकिस्तानकडे नजर रोखून असलेल्या पुतळ्याकडे बघून भारताकडे वाकड्या नजरेने बघण्याची कुणाची हिंमत होणार नाही.

Maratha Reservation
Maharashtra Politics: भाजपची पुन्हा मोठी खेळी? शरद पवारांच्या जवळच्या नेत्याला पक्षात घेण्याच्या हालचाली सुरू

मुख्यमंत्री पुढे म्हणाले, शासनाने दांडपट्टा या शस्त्राला राज्यशस्त्र म्हणून घोषित केले आहे. तसेच सुधीर मुनगंटीवार हे लंडनहून वाघनखं महाराष्ट्रात आणणार आहोत. शिवरायांना अभिप्रेत असलेलं सुराज्य आपल्याला निर्माण करायचं आहे. आदिवासींसाठीही राज्य शासनाने मोठ्या योजना हाती घेतल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

Maratha Reservation
Covid Study: कोरोनामुळे इतर जगापेक्षा भारतीयांच्या फुफ्फुसांचं झालं सर्वाधिक नुकसान, संशोधनात समोर आली धक्कादायक बाब समोर

मराठा आरक्षणाबद्दल बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, उद्या (मंगळवार, दि. २०) विधीमंडळाचं विशेष अधिवेशन बोलावलं आहे. ओबीसी आणि इतर समाजघटकाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी हे विशेष अधिवेशन घेण्यात येणार आहे. उद्याच्या अधिवेशनातून मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचं एकनाथ शिंदेंनी जाहीर केलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com